Dipika Kakar Health Update: सेकंड स्टेजचा लिव्हर कॅन्सर, 14 तासांची सर्जरी; आता दिपिका कक्करची प्रकृती कशी? पतीनं शेअर केली हेल्थ अपडेट

Dipika Kakar Health Update: दीपिका कक्करला स्टेज 2 कॅन्सर असल्याचं कळताच चाहते तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. दीपिका तिचा पती शोएबसह नेहमीच सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांशी जोडली गेली आहे.

Continues below advertisement

Dipika Kakar Health Update: अभिनेत्री दीपिका कक्कर (Actress Dipika Kakar) आणि तिचा पती अभिनेता शोएब इब्राहिम (Shoaib Ibrahim) सध्या त्यांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळातून जात आहेत. दीपिकाला स्टेज 2 लिव्हर कॅन्सरचं (Stage 2 Liver Cancer) निदान झालं, त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू झाले आणि 3 जून रोजी तिची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पती शोएब इब्राहिमनं सांगितलं की, दीपिका आयसीयूमध्ये आहे आणि तिची प्रकृती स्थिर आहे. तसेच, शोएबनं चाहत्यांना दीपिकासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं. 

Continues below advertisement

टेलिव्हिजन अभिनेत्री दीपिका कक्करला स्टेज 2 कॅन्सर असल्याचं कळताच चाहते तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. दीपिका तिचा पती शोएबसह नेहमीच सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांशी जोडली गेली आहे. तिच्या कॅन्सरची बातमी आल्यानंतर चाहते दीपिका कधी बरी होईल आणि परत येईल याची वाट पाहत होते.

शोएबनं शेअर केली इंस्टा पोस्ट 

शोएबनं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केली. त्यानं दीपिकाची हेल्थ अपडेट चाहत्यांसोबत शेअर केली. त्यानं लिहिलं की, सर्वांना नमस्कार, दीपिकाची शस्त्रक्रिया बराच काळ चालली, म्हणून काल रात्री अपडेट देऊ शकलो नाही. दीपिका 14 तास ऑपरेशन थिएटरमध्ये होती. पण, सर्व काही व्यवस्थित झालं. दीपी सध्या आयसीयूमध्ये आहे. तिला वेदना होत आहेत, पण सध्या तिची प्रकृती स्थिर आहे आणि बरी होत आहे. 

शोएबकडून चाहत्यांचे आभार

शोएबनं पुढे लिहिलंय की, तुमच्या सर्वांच्या प्रेमासाठी, प्रार्थनांसाठी आणि पाठिंब्यासाठी मनापासून धन्यवाद. हे सर्व आमच्यासाठी खरोखरच खूप काही आहे. ती आयसीयूमधून बाहेर येताच, मी पुन्हा अपडेट करेन. पुन्हा धन्यवाद, तिच्यासाठी प्रार्थना करत राहा. 

दरम्यान, गेल्या महिन्यात दीपिकानं एका इमोशनल इंस्टाग्राम पोस्टद्वारे सांगितलं होतं की, तिला स्टेज 2 चा लिव्हर कॅन्सर आहे. पोटाच्या वरच्या भागात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार केल्यानंतर जेव्हा तिनं डॉक्टरांकडून तपासणी केली, तेव्हा असं आढळून आलं की, तिच्या लिव्हरमध्ये टेनिस बॉलच्या आकाराचा ट्यूमर आहे. काही तपासण्या केल्यानंतर दीपिकाला लिव्हर कॅन्सर असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर तिच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

IPL 2025: पन्नाशीची असूनही 25 वर्षांच्या तरुणीला लाजवणारं प्रीति झिंटाचं लाघवी सौंदर्य; PBKS च्या मालकीणीचं ब्युटी सीक्रेट माहितीय?

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »