एक्स्प्लोर

Ajit Pawar: अजित पवार-अमित शाहांची भेट नाहीच, राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीवर प्रश्नचिन्ह

Ajit Pawar: आज महायुतीच्या तिन्ही नेत्यांची होणार आहे मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. 

Ajit Pawar Maharashtra Goverment: गृहखात्यावरून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात चढाओढ सुरू आहे तर तिकडे आपल्या पदरात महत्त्वाची खाती पडावी म्हणून अजित पवार (Ajit Pawar) गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत होते. अजित पवार यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीत गेल्याची माहिती समोर आली होती. मात्र अजित पवार आणि अमित शाह यांची भेट न झाल्याने राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीवर प्रश्नचिन्ह कायम आहे.

दोन दिवसांच्या दिल्ली मुक्कामानंतरही अजित पवारांची अमित शाह (Ajit Pawar-Amit Shah Meet) यांची भेट झाली नाही. त्यामुळे आज  भेट न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, सुनेत्रा पवार, पार्थ पवार देखील मुंबईकडे रवाना झाले आहे. दरम्यान,  आज महायुतीच्या तिन्ही नेत्यांची होणार आहे मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. 

अजित पवार गटाचे संभाव्य मंत्री कोण?   

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंत्रिपदी ज्यांची वर्णी लागू शकते त्या नेत्यांची नाव एबीपी माझाच्या हाती लागली आहेत. आदिती तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद कायम राहणार असल्याचं कळतंय. तर दत्ता भरणे, नरहरी झिरवाळ, संजय बनसोडे, इंद्रनील नाईक, संग्राम जगताप आणि सुनील शेळके यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते. दरम्यान, राष्ट्रवादीला राज्य सरकारमध्ये 7 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री पदं हवी असल्याची सूत्रांची माहिती आहे. याशिवाय प्रफुल पटेलांसाठी केंद्र सरकारमध्ये एक कॅबिनेट पद, तसंच पक्षातील वरिष्ठ नेत्यासाठी राज्यपाल पदाचीही मागणी असल्याची माहिती आहे.

महायुतीचा उद्या मुंबईत शपथविधी-

मुंबईच्या आझाद मैदानात 5 नोव्हेंबरला होणाऱ्या महायुतीच्या शपतविधीसाठी मुंबई पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त राहणार आहे. शपथविधी सोहळ्या दरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई पोलिसांकडून अडीच हजारहून अधिक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शपथविधी दरम्यान 10 पोलीस उपायुक्त, 20 सहाय्यक पोलीस आयुक्त, 100 पोलीस निरीक्षक, 150 सहाय्यक व पोलीस उपनिरीक्षकांसह 1500 हून अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर सशस्र पोलीस दल,  टास्क फोर्ससह इतर सुरक्षा यंत्रणाही सज्ज असणार आहेत. याशिवास आझाद मैदान परिसर हा नो फ्लाईंग झोन म्हणून घोषित करण्यात आला असून आजू बाजूच्या उंच इमारतींवरही पोलिस तैनात असणार आहेत.

अजित पवार मुंबईकडे रवाना, VIDEO:

संबंधित बातमी:

Maharashtra CM Oath Ceremony: उद्या फक्त मुख्यमंत्री अन् दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार; तीन जणांची नावंही आली समोर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Wari 2025 : यंदा दिंड्यांसाठी अनुदान नाही, वारकर्‍यांचा सरकारला संतप्त सवाल, म्हणाले, मागील वर्षी निवडणुकीमुळे आर्थिक मदत दिली होती का?
यंदा दिंड्यांसाठी अनुदान नाही, वारकर्‍यांचा सरकारला संतप्त सवाल, म्हणाले, मागील वर्षी निवडणुकीमुळे आर्थिक मदत दिली होती का?
Kolhaupr News: कोल्हापुरात जागेच्या वादातून तुंबळ हाणामारी; काट्या आणि खुरप्यासह हल्ला करत बेदम मारहाण
कोल्हापुरात जागेच्या वादातून तुंबळ हाणामारी; काट्या आणि खुरप्यासह हल्ला करत बेदम मारहाण
बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा, मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर शेतकरी आंदोलन उभारणार; नाना पटोलेंचा इशारा
बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा, मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर शेतकरी आंदोलन उभारणार; नाना पटोलेंचा इशारा
Asha Sevika Andolan : शिंदे सरकारच्या काळात मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन, अद्याप पुर्तता नाहीच, आशा सेविका पुन्हा आंदोलन छेडणार, प्रमुख मागण्या कोणत्या?
शिंदे सरकारच्या काळात मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन, अद्याप पुर्तता नाहीच, आशा सेविका पुन्हा आंदोलन छेडणार, प्रमुख मागण्या कोणत्या?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dive Ghat Rain : पाऊस, चिखल.... माऊलींच्या पालखीमार्गावरील दिवेघाटाची दुरावस्थाSupriya Sule on Ajit Pawar : अजित पवारांसोबत जाणार का? सुप्रिया सुळेंचं उत्तर ऐका...Girish Mahajan : ठाकरे-फडणवीसांमध्ये काय चर्चा झाली?गिरीश महाजन म्हणाले...Ahmedabad Plane Crash:लंडनवारीचं स्वप्न, विमानात भंग;पंड्या आणि जोशी कुटुंबीयांना शोक Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari 2025 : यंदा दिंड्यांसाठी अनुदान नाही, वारकर्‍यांचा सरकारला संतप्त सवाल, म्हणाले, मागील वर्षी निवडणुकीमुळे आर्थिक मदत दिली होती का?
यंदा दिंड्यांसाठी अनुदान नाही, वारकर्‍यांचा सरकारला संतप्त सवाल, म्हणाले, मागील वर्षी निवडणुकीमुळे आर्थिक मदत दिली होती का?
Kolhaupr News: कोल्हापुरात जागेच्या वादातून तुंबळ हाणामारी; काट्या आणि खुरप्यासह हल्ला करत बेदम मारहाण
कोल्हापुरात जागेच्या वादातून तुंबळ हाणामारी; काट्या आणि खुरप्यासह हल्ला करत बेदम मारहाण
बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा, मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर शेतकरी आंदोलन उभारणार; नाना पटोलेंचा इशारा
बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा, मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर शेतकरी आंदोलन उभारणार; नाना पटोलेंचा इशारा
Asha Sevika Andolan : शिंदे सरकारच्या काळात मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन, अद्याप पुर्तता नाहीच, आशा सेविका पुन्हा आंदोलन छेडणार, प्रमुख मागण्या कोणत्या?
शिंदे सरकारच्या काळात मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन, अद्याप पुर्तता नाहीच, आशा सेविका पुन्हा आंदोलन छेडणार, प्रमुख मागण्या कोणत्या?
Israel on Iran Attack: इस्रायलच्या हल्ल्यांनंतर इराणचाही कडवा प्रतिकार; अणुकार्यक्रम पुढे नेण्यासाठी अधिक दृढनिश्चयी होण्याची चिन्हे
इस्रायलच्या हल्ल्यांनंतर इराणचाही कडवा प्रतिकार; अणुकार्यक्रम पुढे नेण्यासाठी अधिक दृढनिश्चयी होण्याची चिन्हे
SA vs AUS WTC Final : दक्षिण आफ्रिका WTC जिंकण्यापासून फक्त 69 धावा दूर; मार्कराम अन् बावुमासमोर कांगारूंचे सर्व डाव फसले, तिसऱ्या दिवशी काय घडलं?
दक्षिण आफ्रिका WTC जिंकण्यापासून फक्त 69 धावा दूर; मार्कराम अन् बावुमासमोर कांगारूंचे सर्व डाव फसले, तिसऱ्या दिवशी काय घडलं?
सत्यजितसिंह पाटणकरांनी सुरत गुवाहाटीचा मुद्दा काढला, शंभूराज देसाई विधानसभा निकालाचा दाखला देत म्हणाले, ...तर त्यांची रिक्षा आम्ही पलटी केली नसती
पाटणकर देसाई वार पलटवार सुरुच, शंभूराज देसाईंचं सुरत गुवाहाटीच्या मुद्याला विधानसभेला रिक्षा पलटी केल्याच्या संदर्भासह प्रत्युत्तर
गुडन्यूज... ना समारंभ, ना उद्घाटनाचा घाट; विक्रोळी उड्डाण पूल नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय
गुडन्यूज... ना समारंभ, ना उद्घाटनाचा घाट; विक्रोळी उड्डाण पूल नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय
Embed widget
OSZAR »