एक्स्प्लोर

Maharashtra Board HSC Results 2025: बारावीच्या निकालासंबंधीत 5 प्रश्नांची उत्तरे; रिझल्टची सगळी माहिती वाचा एका क्लिकवर....

Maharashtra Board HSC Results 2025: राज्यभरातील बारावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांची प्रतीक्षा लागून राहिलेल्या निकालाची अखेर तारीख समोर आली आहे.

Maharashtra Board HSC Results 2025: राज्यभरातील बारावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांची प्रतीक्षा लागून राहिलेल्या निकालाची अखेर तारीख समोर आली आहे. महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल (Maharashtra Board 12th Result) उद्या म्हणजेच सोमवारी (05 मे 2025) जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं (MSBSHSE) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC/12th) निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल उद्या दुपारी जाहीर केला जाणार आहे.

यंदाच्या वर्षी परीक्षेत एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यामध्ये 8 लाख 10 हजार 348 मुले, तर 6 लाख 94 हजार 652 मुली आहेत. यंदा 37 तृतीयपंथी नागरिकही परीक्षेसाठी बसले आहेत. राज्यात एकूण 10 हजार 550 कनिष्ठ महाविद्यालयातील या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांसाठी 3 हजार 373 मुख्य केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. अशातच बोर्डाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जाऊन गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहू शकतील. अशातच हा निकाल कुठे आणि कसा पाहता येणार? विद्यार्थ्यांना गुण कळणार की फक्त पास-नापास समजणार? निकाल पाहताना अडचणी आल्या तर काय कराल? अशा साऱ्या प्रश्नांची उत्तरे येथे जाणून घेऊ. 

1) निकाल कुठे पाहता येणार?

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल (Maharashtra Board 12th Result) पाहाण्यासाठी खालील संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येतील : (Where can I check HSC 12th result See A to Z information)

mahresult.nic.in

results.digilocker.gov.in

mahahsscboard.in

https://hscresult.mkcl.org/

2) निकाल कसा पाहता येणार?

-सर्वप्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर अथवा वर दिलेल्या वेबसाइट जा.   

- त्यानंतर होमपेजवरील HSC च्या लिंकवर क्लिक करा.

- तुमचा परिक्षा क्रमांक आणि इतर आवश्यक तपशील त्यामध्ये टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

- तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.त्यानंतर तो सेव्ह करा आणि प्रिंट करा. 

3) किती वाजता निकाल जाहीर होणार?

अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे.  निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि आईचे पहिले नाव आवश्यक असेल.

4) विद्यार्थ्यांना गुण कळणार की फक्त पास-नापास समजणार?

विद्यार्थ्यांना निकालात संपूर्ण विषयाचे गुण दिसणार आहे. त्यामुळे ऑनलाईन निकाल पाहताना कोणत्या विषयात किती गुण मिळाले, याची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

5) निकाल पाहताना अडचणी आल्या तर काय कराल?

महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल बघात असताना बहुतांश वेळी वेबसाईट ट्राफिकमुळे धीम्यागतीने चालत असते. अशावेळी  आपल्या मोबाईलवरून MHSCC असे टाईप कारा आणि 5776 या क्रमांकावर SMS करा. जेणेकरून तुम्हाला SMS द्वारेही निकाल पाहता येणार आहे. निकालानंतर काही आठवड्यांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येईल. तर जुलै-ऑगस्ट 2025 मध्ये पुरवणी परीक्षा आयोजित केली जाईल, आणि त्याचा निकाल सप्टेंबर 2025 मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Accident News: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरची ॲसिडच्या टँकरला धडक, नायट्रिक ॲसिडच्या गळतीने लोकांना श्वास घ्यायला त्रास
सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरची ॲसिडच्या टँकरला धडक, नायट्रिक ॲसिडच्या गळतीने लोकांना श्वास घ्यायला त्रास
Prataprao Jadhav: शरद पवारांनी वेळोवेळी भाजपला मदत केलीय, राज्यात भाजपचं सरकार आणण्यात त्यांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा; राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचा खळबळजनक दावा
शरद पवारांनी वेळोवेळी भाजपला मदत केलीय, राज्यात भाजपचं सरकार आणण्यात त्यांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा; राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचा खळबळजनक दावा
Chhatrapati Sambhajinagar Crime : संजय शिरसाट-इम्तियाज जलील यांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी, परस्परविरोधी गुन्हे दाखल, नेमकं काय घडलं?
संजय शिरसाट-इम्तियाज जलील यांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी, परस्परविरोधी गुन्हे दाखल, नेमकं काय घडलं?
Sharad Pawar: लोकांना सोबत घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर ही परिस्थिती आली नसती; शरद पवारांचा अजितदादांना टोला
लोकांना सोबत घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर ही परिस्थिती आली नसती; शरद पवारांचा अजितदादांना टोला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Robbery : पुण्यात बंटी-बबलीचा कारनामा उघड, घरात घुसून चोरी; मोबाईल, रोकड लंपासShivendraraje Bhosale : महाराष्ट्रातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार,कॅबिनेट बैठकीत निर्णयABP Majha Headlines : 09:00AM : 18 June 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMNS on Hindi Language Issue : हिंदीला तिसऱ्या भाषेचा दर्जा? मनसेकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Accident News: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरची ॲसिडच्या टँकरला धडक, नायट्रिक ॲसिडच्या गळतीने लोकांना श्वास घ्यायला त्रास
सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरची ॲसिडच्या टँकरला धडक, नायट्रिक ॲसिडच्या गळतीने लोकांना श्वास घ्यायला त्रास
Prataprao Jadhav: शरद पवारांनी वेळोवेळी भाजपला मदत केलीय, राज्यात भाजपचं सरकार आणण्यात त्यांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा; राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचा खळबळजनक दावा
शरद पवारांनी वेळोवेळी भाजपला मदत केलीय, राज्यात भाजपचं सरकार आणण्यात त्यांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा; राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचा खळबळजनक दावा
Chhatrapati Sambhajinagar Crime : संजय शिरसाट-इम्तियाज जलील यांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी, परस्परविरोधी गुन्हे दाखल, नेमकं काय घडलं?
संजय शिरसाट-इम्तियाज जलील यांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी, परस्परविरोधी गुन्हे दाखल, नेमकं काय घडलं?
Sharad Pawar: लोकांना सोबत घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर ही परिस्थिती आली नसती; शरद पवारांचा अजितदादांना टोला
लोकांना सोबत घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर ही परिस्थिती आली नसती; शरद पवारांचा अजितदादांना टोला
Mumbai Rain Powai Lake: आनंदाची बातमी! मुंबईतला पहिला तलाव भरला, पवई तलाव ओसंडून वाहू लागला
आनंदाची बातमी! मुंबईतला पहिला तलाव भरला, पवई तलाव ओसंडून वाहू लागला
Chhatrapati Sambhajinagar Crime : संतोष लड्डांच्या घरातील पैशांची माहिती जवळच्या मित्रानेच बाहेर फोडली, जादूटोण्याने चोरीचा प्लॅनही आखला, पण...
संतोष लड्डांच्या घरातील पैशांची माहिती जवळच्या मित्रानेच बाहेर फोडली, जादूटोण्याने चोरीचा प्लॅनही आखला, पण...
Hemant Dhome On Hindi Language In Marathi Schools: मराठी अभिनेत्याकडून हिंदी सक्तीचा कडाडून निषेध; म्हणाला,
मराठी अभिनेत्याकडून हिंदी सक्तीचा कडाडून निषेध; म्हणाला, "नेमकं काय अभिजात होतंय?"
Pandharpur Wari 2025: जूनमध्येच उजनी धरणाने पन्नाशी ओलांडली, आषाढी काळात चंद्रभागेत कुंभमेळ्याप्रमाणे तात्पुरता पूल उभारणे अशक्य; पंढरपूरचे जिल्हाधिकारी नेमकं काय म्हणाले?
जूनमध्येच उजनी धरणाने पन्नाशी ओलांडली, आषाढी काळात चंद्रभागेत कुंभमेळ्याप्रमाणे तात्पुरता पूल उभारणे अशक्य; पंढरपूरचे जिल्हाधिकारी नेमकं काय म्हणाले?
Embed widget
OSZAR »