एक्स्प्लोर

FYJC Admission: अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला मोठा प्रतिसाद, 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी, शालेय शिक्षण विभागाची माहिती

FYJC Admission : महाराष्ट्रात यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं राबवली जात आहे. या प्रवेश प्रकियेसाठी 10 लाक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

मुंबई: इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यात येत असून नोंदणी प्रक्रियेच्या पहिल्या फेरीमधील नोंदणीमध्ये दि. 1 जून रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अखेर 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती सहसंचालक (माध्यमिक) डॉ.श्रीराम पानझाडे यांनी दिली आहे. 

प्रवेश प्रक्रियेतील पहिली फेरी सुरू झाल्यानंतर संपूर्ण राज्यातून विद्यार्थी नोंदणी करत असून संकेतस्थळावर ताण येत असल्याने थोड्या प्रमाणात संकेतस्थळ संथ गतीने चालणे, तसेच प्रवेश शुल्क भरण्यामध्ये अडचणी, कॉलेज पसंतीक्रम भरण्यामध्ये अडथळे येणे अशा अडचणी निदर्शनास आल्या. याबाबींवर संबंधित कंपनीमार्फत तत्काळ उपायोजना/ पर्यायी व्यवस्था करुन प्रक्रिया सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेचा नोंदणी अर्ज भरण्याकरिता दिनांक 26 मे 2025 ते 3 जून 2025 पर्यंतचा एकूण नऊ दिवसांचा पुरेसा कालावधी देण्यात आला असून या फेरीची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याची तक्रार असल्यास अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्यापूर्वी प्रत्येक तक्रार दूर केली जाईल, असेही विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. ही सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली जात असून कोणत्याही विद्यार्थ्याने काळजी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावरील काही बदल, नवीन पर्याय समाविष्ट करणे आवश्यक असल्याने त्याबाबतचे काम सुरू होते. यादरम्यान क्षेत्रिय स्तरावरुन आणि तज्ज्ञांकडून प्राप्त होणारे बदल यामुळे संकेतस्थळ तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण करण्यासाठी काही कालावधी लागला. त्यामुळे प्रक्रियेच्या जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार दि. 21 मे 2025 पासून प्रत्यक्ष विद्यार्थी नोंदणी सुरू करणे शक्य झाले नाही. यानंतर संकेत स्थळाबाबत तांत्रिक अडचणी दूर करुन दि. 26 मे 2025 पासून विद्यार्थी नोंदणी सुरू करण्यात आली. या बदलाबाबत संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक, पुणे) यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे स्पष्टीकरण देखील दिलेले आहे. 

विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी विभागस्तरावर तांत्रिक सल्लागार, मार्गदर्शन केंद्र, हेल्पलाईन नंबर, सपोर्ट डेस्क, संकेतस्थळावर मराठी आणि इंग्रजी भाषेमधील माहिती पुस्तिका, प्रश्न-उत्तरे, विद्यार्थी युजर मॅन्युअल, ‘करीअर पाथ’ चा टॅब उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये विद्यार्थ्यांस काही बदल करावयाचा असल्यास ग्रीवन्सचा टॅब उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. विद्यार्थी/ पालक यांच्यासाठी विभाग स्तरावर/ जिल्हा स्तरावर अधिकारी/ कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक संकेत स्थळावर देण्यात आलेले असल्याचेही विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. 

सन 2025-26 पासून संपूर्ण राज्यात प्रवेश प्रकिया राबविण्यात येणार असल्याने यामध्ये 9342 कनिष्ठ महाविद्यालयांमधून 20 लाख 88 हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवेश क्षमता उपलब्ध झाली असल्याचेही शालेय शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: शिवसेना नेत्याने राज ठाकरेंना मुलाच्या लग्नाची पत्रिका दिल्यामुळे उद्धवजी संतापले होते, रस्त्यातूनच गाडी माघारी फिरवली होती: योगेश कदम
शिवसेना नेत्याने राज ठाकरेंना मुलाच्या लग्नाची पत्रिका दिल्यामुळे उद्धवजी संतापले होते, रस्त्यातूनच गाडी माघारी फिरवली होती: योगेश कदम
Nepal Crisis : भारताचा शेजारी नेपाळ पुन्हा पेटला; गेल्या पाच दिवसांपासून आंदोलनाचा भडका, अनेक नेते अटकेच्या भीतीनं भूमिगत
भारताचा शेजारी नेपाळ पुन्हा पेटला; गेल्या पाच दिवसांपासून आंदोलनाचा भडका, अनेक नेते अटकेच्या भीतीनं भूमिगत
Corona Update : देशात तब्बल 27 राज्यांमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरिएंटचा शिरकाव; रुग्णांची संख्या साडे चार हजारांकडे, 44 जणांचा मृत्यू, एका राज्याने केली मास्क सक्ती
देशात तब्बल 27 राज्यांमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरिएंटचा शिरकाव; रुग्णांची संख्या साडे चार हजारांकडे, 44 जणांचा मृत्यू, एका राज्याने केली मास्क सक्ती
Sudhakar Badgujar Nashik : ठाकरे गटाकडून पक्षातून हकालपट्टी, सुधाकर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रिया
Sudhakar Badgujar Nashik : ठाकरे गटाकडून पक्षातून हकालपट्टी, सुधाकर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sudhakar Badgujar Nashik : ठाकरे गटाकडून पक्षातून हकालपट्टी, सुधाकर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रियाSuresh Dhas on Supekar | सुपेकरांनी जेलमधील आरोपींकडून ३०० कोटी रुपये मागितले, धस यांचा दावाBuldhana Wedding: जूनं ते सोनं, कित्येक वर्षानंतर अवतारले बैलगाडीत बैलाच्या घुंगराच्या नादात वऱ्हाडPalghar Chemical Tanker Accident : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: शिवसेना नेत्याने राज ठाकरेंना मुलाच्या लग्नाची पत्रिका दिल्यामुळे उद्धवजी संतापले होते, रस्त्यातूनच गाडी माघारी फिरवली होती: योगेश कदम
शिवसेना नेत्याने राज ठाकरेंना मुलाच्या लग्नाची पत्रिका दिल्यामुळे उद्धवजी संतापले होते, रस्त्यातूनच गाडी माघारी फिरवली होती: योगेश कदम
Nepal Crisis : भारताचा शेजारी नेपाळ पुन्हा पेटला; गेल्या पाच दिवसांपासून आंदोलनाचा भडका, अनेक नेते अटकेच्या भीतीनं भूमिगत
भारताचा शेजारी नेपाळ पुन्हा पेटला; गेल्या पाच दिवसांपासून आंदोलनाचा भडका, अनेक नेते अटकेच्या भीतीनं भूमिगत
Corona Update : देशात तब्बल 27 राज्यांमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरिएंटचा शिरकाव; रुग्णांची संख्या साडे चार हजारांकडे, 44 जणांचा मृत्यू, एका राज्याने केली मास्क सक्ती
देशात तब्बल 27 राज्यांमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरिएंटचा शिरकाव; रुग्णांची संख्या साडे चार हजारांकडे, 44 जणांचा मृत्यू, एका राज्याने केली मास्क सक्ती
Sudhakar Badgujar Nashik : ठाकरे गटाकडून पक्षातून हकालपट्टी, सुधाकर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रिया
Sudhakar Badgujar Nashik : ठाकरे गटाकडून पक्षातून हकालपट्टी, सुधाकर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रिया
Sudhakar Badgujar Expelled from Thackeray Camp: उद्धव ठाकरेंनी पक्षातून हकालपट्टी करताच सुधाकर बडगुजरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी पक्षातून हकालपट्टी करताच सुधाकर बडगुजरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Accident : सिमेंटने भरलेली लाॅरी थेट इको व्हॅनवर उलटली; एकाच कुटुंबातील चौघांसह 9 जणांचा जागीच अंत, लग्न करून परत येताना काळाचा घाला
सिमेंटने भरलेली लाॅरी थेट इको व्हॅनवर उलटली; एकाच कुटुंबातील चौघांसह 9 जणांचा जागीच अंत, लग्न करून परत येताना काळाचा घाला
Sudhakar Badgujar: फडणवीसांना भेटताच भाषा बदललेल्या बडगुजरांचा उद्धव ठाकरेंनी विषयच संपवला, प्रेस कॉन्फरन्स सुरु असताना हकालपट्टीचा आदेश आला
फडणवीसांना भेटताच भाषा बदललेल्या बडगुजरांचा उद्धव ठाकरेंनी विषयच संपवला, प्रेस कॉन्फरन्स सुरु असताना हकालपट्टीचा आदेश आला
YouTuber Jasbir Singh : पाकिस्तानी 'चाखरी' करणाऱ्या गद्दारांची यादी संपता संपेना; आता 'हेरगिरी'आरोपाखाली आणखी एका युट्यूबरला अटक; गद्दार ज्योती मल्होत्राशी संबंध, 11 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स
पाकिस्तानी 'चाखरी' करणाऱ्या गद्दारांची यादी संपता संपेना; आता 'हेरगिरी'आरोपाखाली आणखी एका युट्यूबरला अटक; गद्दार ज्योती मल्होत्राशी संबंध, 11 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स
Embed widget
OSZAR »