ट्रेंडिंग
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मोठी अपडेट; माजी नगराध्यक्षचे पती असलेल विनोद गंगणेला अटक; न्यायालयाच्या आवारातूनच घेतलं ताब्यात
Tuljapur Drugs Case : तुळजापूरमधील बहुचर्चित ड्रग्ज प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील फरार आरोपी विनोद गंगणेला अखेर अटक करण्यात आली आहे.
Tuljapur Drugs Case : तुळजापूरमधील बहुचर्चित ड्रग्ज प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील फरार आरोपी विनोद गंगणेला अखेर अटक करण्यात आली आहे. अटकपूर्व जामीन फेटल्यानंतर कोर्टाच्या आवारातूनच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. माजी नगराध्यक्षचे पती असलेले विनोद गंगणे अनेक दिवसापासून फरार होते. परिणामी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 20 वर पोहचली असून अजूनही 17 आरोपी फरारच असल्याचे समोर आले आहे.
आतापर्यंत 20 आरोपीला अटक, अद्याप 17 आरोपी फरार
पुढे आलेल्या माहितीनुसार, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात सेवन गटातील आरोपी माजी नगराध्यक्षाचे पती असलेले विनोद उर्फ पिटू गंगणे यास पोलिसांनी न्यायालयाच्या आवारातून ताब्यात घेतलं. विनोद गंगणे यांनी न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. शुक्रवारी उशिरापर्यंत जामीन अर्जावर युक्तिवाद झाला. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अनेक दिवसांपासून फरार असलेल्या गंगनेला पोलिसांनी अटक केली. त्यामुळे ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 20 आरोपी अटकेत आहेत. तर अजूनही सतरा आरोपी फरार आहेत. त्यामुळे फरार आरोपी नेमकं कधी पोलिसांच्या हाती लागतील हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 10 हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल
दरम्यान, तुळजापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेलं ड्रग्ज तस्करीची सर्वत्र मोठी चर्चा आहे. या प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळात देखील उमटताना दिसत आहे. अशातच शिवसेना गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी ड्रग्ज प्रकरणातील "आका"ला मोकाट सोडण्यात आलं आहे. या प्रकरणात पोलीस सहभागी असल्याचा उल्लेख जबाबात असूनही कारवाई झालेली नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, 15 फेब्रुवारी 2025 ला तुळजापूर तालुक्यात 2.5 लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात अनेक उलगडे होत आहेत. लाखो भाविकांच्या तुळजापुरात ड्रग्ज तस्करीमध्ये पुजारीच पेडलर असल्याचं समोर आलं होतं. दरम्यान, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. तब्बल 10 हजार पानांचे दोषआरोपपत्र धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 35 आरोपी असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात राजकीय कनेक्शन समोर आल्यानंतरआतापर्यंत 20 आरोपींना अटक करण्यात आली असून 17 आरोपी फरार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या