एक्स्प्लोर

Pune Crime Vaishnavi Hagwane case: वैष्णवीने बाळ होणार आहे सांगितल्यावर शशांकने घेतला चारित्र्यावर संशय, म्हणाला, हे मूल माझं नाही

Pune Vaishnavi Hagwane case: वैष्णवीची मृत्यूच्या सहा महिनेआधी पोलिसांत तक्रार, राष्ट्रवादीचे राजेंद्र हगवणे मुलासह फरार. हगवणे यांनी वैष्णवीच्या कुटुंबीयांकडून 51 तोळे सोनं घेतलं होतं

Vaishnavi Hagwane Suicide case: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) यांनी 16 मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagwane) यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली यावरुन अनेक उलटसुलट चर्चा सुरु आहेत. वैष्णवीने सहा महिन्यांपूर्वी सासरच्यांकडून आपला हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ केल्याची तक्रार बावधन पोलीस ठाण्यात दिली होती. आपल्याला नवरा शशांक हगवणे (Shashank Hagwane) आणि सासरे राजेंद्र हगवणे (Rajendra Hagwane) यांच्याकडून मारहाण होत असल्याचेही तिने तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर आता वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर राजेंद्र हगवणे हे फरार झाले आहेत. तर शशांक हगवणे याला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिसांनी दाखल करुन घेतलेल्या एफआयआरमधून आणखी सविस्तर माहिती समोर आली आहे. शशांक हगवणे हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार वैष्णवी हिने ऑगस्ट 2023 मध्ये गरोदर असल्याचा बातमी पती शशांक याला सांगितली.  तेव्हा शशांकने वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतला.  हे बाळ माझे नाही दुसऱ्या कोणाचे तरी असेल असे म्हणून पती शशांक व सासरच्या लोकांनी तिच्यासोबत भांडण करुन तिला मारहाण केली होती. शशांक याने वैष्णवी हीस जबरदस्तीने शिवीगाळ व मारहाण करुन माझ्या घरातून चालती हो, नाहीतर मी तुला हाकलून देईन, असे म्हणत घरातून बाहेर काढले.  त्यानंतर वैष्णवी ही माहेरी आल्यानंतर तिने तिच्यासोबत होत असलेल्या छळवणुक व हुड्यासाठी पैशाची मागणी याबाबतची माहिती तिच्या आईवडीलांना दिली होती. त्याचबरोबर सासरच्या कुटुंबियांकडुन मानसिक त्रास सहन न झाल्याने दि. 27 नोव्हेंबर 2023 रोजी वैष्णवीने जाचाला कंटाळून औषध (रेंट पॉईझन) जेवणातून खावून स्वःचा जीव संपवण्याचा प्रयत्न केला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Vaishnavi Hagwane Suicide Case: 51 तोळं सोनं, चांदीची भांडी अन् फॉर्च्युनर कार

वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी दुपारी साडे‑चारच्या सुमारास बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला होता. राजेंद्र तुकाराम हगवणे यांनी मुलीच्या घरच्यांकडून 51 तोळे सोने, फॉरच्युनर गाडी, चांदीची भांडी घेतली. एवढंच नाही तर सनीज वर्ल्ड या ठिकाणी लग्न करुन देण्याच्या बोलीवर मुलीशी लग्न करुन दिलं, अशी माहिती एफआयरमधून समोर आली आहे.

लग्न झाल्यानंतर साधारण चार पाच महिन्यांनी सासू लता हगवणे यांनी चांदीची भांडी मागितली होती. ती दिली नाहीत म्हणुन त्याचा राग मनात धरुन सून वैष्णवीस घालूनपाडून बोलून तिच्या चारित्र्यावर संशय घेत सासू लता, नणंद करीश्मा हागवणे, सासरे राजेंद्र हागवणे, दिर सुशील हगवणे यांनी शारीरीक व मानसिक त्रास देणं सुरु केल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

वैष्णवी हागवणेंच्या आत्महत्येनंतर या प्रकरणातील दोन आरोपी फरार आहे. सासरे राजेंद्र हागवणे, दीर सुशील हागवणे फरार आहेत. वैष्णवीची सासू, नणंद आणि पती शशांक यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने आज (21 मे) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अटक आरोपींची कसून चौकशी करीत आहेत.

आणखी वाचा

51 तोळं सोनं, चांदीची भांडी अन् फॉरच्युनर कार; शरीरावर 19 जखमा, वैष्णवीची मृत्यूच्या सहा महिनेआधी पोलिसांत तक्रार, राष्ट्रवादीचे राजेंद्र हगवणे मुलासह फरार

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजप नेत्याचं हायवेवरच खुल्लम खुल्ला सुरू; कारमधून उतरुन महिलेसोबत संबध, व्हिडिओ व्हायरल
भाजप नेत्याचं हायवेवरच खुल्लम खुल्ला सुरू; कारमधून उतरुन महिलेसोबत संबध, व्हिडिओ व्हायरल
विद्यार्थ्यांनो, तीनच दिवस उरले; मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीस मुदतवाढ
विद्यार्थ्यांनो, तीनच दिवस उरले; मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीस मुदतवाढ
हाय गर्मी, अभिनेत्री अंकिता लोखंडेचा समुद्रकिनारी बोल्ड अवतार, इन्स्टाग्रामवर शेअर केले खास फोटो
हाय गर्मी, अभिनेत्री अंकिता लोखंडेचा समुद्रकिनारी बोल्ड अवतार, इन्स्टाग्रामवर शेअर केले खास फोटो
सरकारच्या तिजोरीत मोठी भर, RBI कडून 2.68 लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर
सरकारच्या तिजोरीत मोठी भर, RBI कडून 2.68 लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vaishnavi Hagawane Zero Hour : बाळाचा ताबा घेतलेला निलेश विकृत, स्वतःच्याच पत्नीचा तयार केला MMSVaishnavi Hagawane Zero Hour : फडणवीस गृहमंत्रिपदावर राहण्याच्या पात्रतेचे तरी आहेत का? - सरोदेVaishnavi Hagawane Zero Hour : जनतेचा पोलिसांवर विश्वास उरला नाही?  माजी पोलीस अधिकाऱ्याचं परखड मतVaishnavi Hagawane Zero Hour : बाळाचा ताबा घ्यायला गेलेल्या कस्पटे कुटुंबाला पोलिसांनी काय सांगितलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप नेत्याचं हायवेवरच खुल्लम खुल्ला सुरू; कारमधून उतरुन महिलेसोबत संबध, व्हिडिओ व्हायरल
भाजप नेत्याचं हायवेवरच खुल्लम खुल्ला सुरू; कारमधून उतरुन महिलेसोबत संबध, व्हिडिओ व्हायरल
विद्यार्थ्यांनो, तीनच दिवस उरले; मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीस मुदतवाढ
विद्यार्थ्यांनो, तीनच दिवस उरले; मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीस मुदतवाढ
हाय गर्मी, अभिनेत्री अंकिता लोखंडेचा समुद्रकिनारी बोल्ड अवतार, इन्स्टाग्रामवर शेअर केले खास फोटो
हाय गर्मी, अभिनेत्री अंकिता लोखंडेचा समुद्रकिनारी बोल्ड अवतार, इन्स्टाग्रामवर शेअर केले खास फोटो
सरकारच्या तिजोरीत मोठी भर, RBI कडून 2.68 लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर
सरकारच्या तिजोरीत मोठी भर, RBI कडून 2.68 लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर
बाप रे बाप, कारमध्ये भलीमोठी कॅश; बुलढाणा पोलिसांची कारवाई, कोटी रुपयांचे 500 चे बंडल जप्त
बाप रे बाप, कारमध्ये भलीमोठी कॅश; बुलढाणा पोलिसांची कारवाई, कोटी रुपयांचे 500 चे बंडल जप्त
धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन मुलीवर आचाऱ्याकडून अत्याचार; बंधाऱ्याजवळ चप्पल अन् ओढणी आढळली
धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन मुलीवर आचाऱ्याकडून अत्याचार; बंधाऱ्याजवळ चप्पल अन् ओढणी आढळली
दिल्ली दौऱ्यावर निघण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांचा कस्पटेंना फोन; वैष्णवीच्या वडिलांच्या CM कडे 2 मागण्या
दिल्ली दौऱ्यावर निघण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांचा कस्पटेंना फोन; वैष्णवीच्या वडिलांच्या CM कडे 2 मागण्या
वैष्णवीचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात, लवकर निकाल, अजित पवारांचा कस्पटेंना शब्द; IPS सुपेकरांनाही इशारा
वैष्णवीचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात, लवकर निकाल, अजित पवारांचा कस्पटेंना शब्द; IPS सुपेकरांनाही इशारा
Embed widget
OSZAR »