ट्रेंडिंग
Nashik Crime : प्रेमविवाह ठरला औटघटकेचा; सतत मोबाईल बघते म्हणून सासूकडून छळ, महिन्यातच विवाहितेचं टोकाचं पाऊल; नाशिक पुन्हा हादरलं!
Nashik Crime : राज्यात महिलांच्या अत्याचारात वाढ होण्याचे प्रमाण वाढतच असल्याचे समोर आलंय. अशातच नाशिकमध्ये आणखी एक प्रकार समोर आला असून या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
Nashik Crime : राज्यात महिलांच्या अत्याचारात वाढ होण्याचे प्रमाण वाढतच असल्याचे समोर आलंय. अशातच नाशिकमध्ये आणखी एक प्रकार समोर आला असून या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. नाशकात प्रेमविवाह केलेल्या 21 वर्षीय विवाहितेला घरातील काम नीट करत नाही, जास्त बोलत नाही, सारखे मोबाईल बघते म्हणून सासूकडून छळ सुरू होता. यात पती लक्ष देत नसल्याने एकाएकी पडलेल्या विवाहितेने टोकाचं पाऊल (Nashik Crime) उचलत आपले जीवन संपवले आहे. धक्कादायक बाब म्हणजे लग्नानंतर अवघ्या महिन्याभरातच विषारी औषध घेत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात पतीसह सासू विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अवघ्या महिन्याभरातच विषारी औषध घेत आत्महत्या
पुढे आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी संशयित पतीसह सासूला अटक करण्यात आली आहे. विवाहितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 27 मे रोजी भाग्यश्रीने आईला फोन करत सासू आणि पती सारखे बोलतात, पती बाजू घेत नाही, मी एकाएकी पडले आहे, असे सांगून फोन बंद केला. त्यानंतर त्याच रात्री नऊ वाजता तिने विषारी औषध घेतल्याची माहिती महिलेच्या सासरच्यांकडून कळाली. या घटनेनंतर तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
लेडिज बाथरूममध्ये महिलांचे अश्लील व्हिडिओ, एकाला अटक
मुंबईच्या खासगी हाॅटेलमधील लेडिज बाथरूममध्ये महिलांचे अश्लील व्हिडिओ काढल्या प्रकरणी एकाला अटक केली आहे. राजनकुमार चौपाल असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा मधुबन बिहारचा राहणारा आहे. राजनकुमार याच्या मोबाइलमध्ये 2 महिला आणि 1 अल्पवयीन मुलीचे बाथरूममधील अश्लील व्हिडिओ सापडले आहेत. एक महिला भूलेश्वर येथील हाॅटेलमध्ये शौचालयात गेली असताना राजनकुमार चोरून अश्लिली व्हिडिओ काढत होता. ही बाब महिलेच्या लक्षात आल्यानंतर राजनकुमार याला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात त्याच्यावर कलम 77 बी, एन एस 2023 सह 12 पोस्को अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास एलटी मार्ग पोलीस करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या