Nashik Crime : वडिलांसोबत भाजीपाला आणायला गेला, किरकोळ पैशांवरून वाद उफाळला, 19 वर्षीय युवकाला धारधार शस्त्रानं वार करून संपवलं, नाशिकमधील घटना

Nashik Crime : वडिलांसोबत भाजीपाला खरेदीसाठी गेलेल्या 19 वर्षीय युवकाचा किरकोळ पैशांच्या वादातून एका अल्पवयीन मुलाकडून धारदार हत्याराने वार करून हत्या करण्यात आली आहे.

Continues below advertisement

Nashik Crime : पंचवटी पोलीस ठाण्याच्या (Panchavati Police Station) हद्दीत गाडगे महाराज पुलाजवळ बुधवारच्या बाजारात आपल्या वडिलांसोबत भाजीपाला खरेदीसाठी गेलेल्या 19 वर्षीय युवकाचा किरकोळ पैशांच्या वादातून एका अल्पवयीन मुलाकडून धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला. या घटनेची नोंद पंचवटी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. (Nashik Crime News)

Continues below advertisement

पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदलाल उर्फ सूरज जगतकुमार दास परदेशी (वय १९, रा. सीतागुंफा रोड, पंचवटी) हा बुधवारच्या आठवडे बाजारात भाजीपाला घेण्यासाठी आपल्या वडिलांसोबत गाडगे महाराज पुलासमोरून सायंकाळच्या सुमारास जात असताना, त्याचा एका अज्ञात व्यक्तीसोबत किरकोळ पैशांच्या वादावरून वाद झाला. या वादानंतर अज्ञात व्यक्तीने अचानक धारदार हत्याराने नंदलालवर हल्ला करून तेथून पळ काढला.

उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी जखमी नंदलालला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, अतिरक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

उत्तमनगरमध्ये कोयत्याचा थरार; फर्निचर दुकानावर हल्ला 

दरम्यान, नाशिकच्या उत्तमनगर परिसरात बुधवारी (दि. 28) सायंकाळी तीन ते चार गुंडांनी हातात कोयते घेऊन थेट फर्निचरच्या दुकानावर आणि एका घरावर हल्ला चढवल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. या घडलेल्या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांत असुरक्षिततेची भावना आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका वादाच्या पार्श्वभूमीवर ही कुरापत काढून गुन्हेगारी कृत्य घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कोयत्यांनी हल्ला करण्याच्या उद्देशाने आलेल्या या टवाळखोरांनी फर्निचर दुकानाची तोडफोड केली, तसेच शेजारील घरावरही धडक दिली. या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असून, हल्ला करणाऱ्या गुंडांचा शोध सुरू असल्याची माहिती अंबड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आणखी वाचा 

Nashik Crime News : भर रस्तावर जोडप्याला मारहाण 'ती' मदतीसाठी याचना करत राहिली, पण उपस्थितांनी व्हिडिओ शूट करण्यात धन्यता मानली

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »