तरुणाला घरातून ओढत बाहेर काढलं, लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण, वाळू तस्करीतून घनसावंगीत धक्कादायक प्रकार
Jalna Crime: वढ्या गंभीर प्रकारानंतरही अद्याप संबंधित पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. वाळू तस्करीच्या आर्थिक व्यवहारातून ही मारहाण झाल्याचं सांगितलं जातंय.
Jalna Crime: जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील पाथरवाला गावात एका व्यक्तीस टोळक्याने घरातून बाहेर ओढून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून,या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे,एवढ्या गंभीर प्रकारानंतरही अद्याप संबंधित पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. वाळू तस्करीच्या आर्थिक व्यवहारातून ही मारहाण झाल्याचं सांगितलं जातंय. (Jalna News)
नक्की घडले काय?
ही घटना काल (28 मे) दुपारच्या सुमारास घडली. गावातील काही व्यक्तींमध्ये वाळू तस्करीसंदर्भातील आर्थिक व्यवहारावरून वाद सुरू होता. याच वादातून संतप्त टोळक्याने एका तरुणास घरातून जबरदस्तीने बाहेर ओढले आणि लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण सुरू केली. काही जणांनी त्या तरुणाला फरफटत ओढत नेले आणि रस्त्यावर अक्षरशः अमानुषपणे मारहाण केली. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ गावातील काही जणांनी मोबाईलमध्ये चित्रीत केला असून, तो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मारहाण करणाऱ्यांची संख्या 10-12 एवढी होती. नंतर मागून अनेकजण आले आणि तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली.
ट्रेंडिंग
या प्रकारामुळे पाथरवाला गावात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. वाळू तस्करीसारख्या अवैध धंद्यातून अशा प्रकारच्या घटनांना खतपाणी मिळत असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. दरम्यान, वाळू तस्करीच्या आर्थिक व्यवहारातून अमानुष मारहाण झाल्याने गावात मोठी खळबळ उडालीय.
19 वर्षीय युवकाला धारधार शस्त्रानं वार करून संपवलं
पंचवटी पोलीस ठाण्याच्या (Panchavati Police Station) हद्दीत गाडगे महाराज पुलाजवळ बुधवारच्या बाजारात आपल्या वडिलांसोबत भाजीपाला खरेदीसाठी गेलेल्या 19 वर्षीय युवकाचा किरकोळ पैशांच्या वादातून एका अल्पवयीन मुलाकडून धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला. या घटनेची नोंद पंचवटी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदलाल उर्फ सूरज जगतकुमार दास परदेशी (वय १९, रा. सीतागुंफा रोड, पंचवटी) हा बुधवारच्या आठवडे बाजारात भाजीपाला घेण्यासाठी आपल्या वडिलांसोबत गाडगे महाराज पुलासमोरून सायंकाळच्या सुमारास जात असताना, त्याचा एका अज्ञात व्यक्तीसोबत किरकोळ पैशांच्या वादावरून वाद झाला. या वादानंतर अज्ञात व्यक्तीने अचानक धारदार हत्याराने नंदलालवर हल्ला करून तेथून पळ काढला.
हेही वाचा: