Pune Crime News: कोयत्यासह धारधार शस्त्र नाचवत दहशत माजवली, तीन दिवस उलटले तरी पोलिसांत साधी तक्रारही नाही, पुण्यात काय चाललंय काय?
नागरिकांची वर्दळ असणाऱ्या परिसरांमध्ये अशाप्रकारे कोयते, धारदार शस्त्र नाचवत गेल्याने पुन्हा एकदा परिसरात दहशतीचं वातावरण असून पोलिसांचा वचक कमी झाल्याचं बोललं जात आहे.
Pune Crime: पुण्यात गुन्हेगारी घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. पुणे शहरातील डी.पी रोड परिसरात मंगळवारी रात्री उशीरा कॅफेच्या बाहेर तीन तरुणांनी कोयता, पालघनसारखी धारदार शस्त्रे हवेत नाचवत दहशत माजवली. इतकंच नव्हे तर तरुणांनी वाहनांची तोडफोड करत परिसरात भीतीचं वातवरण आहे. पुण्यात किरकोळ कारणांवरून होणारी मारहाण, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न तसेच वाहने फोडण्याचे अनेक प्रकार वारंवार समोर येत आहेत. नागरिकांची वर्दळ असणाऱ्या परिसरांमध्ये अशाप्रकारे कोयते, धारदार शस्त्र नाचवत गेल्याने पुन्हा एकदा परिसरात दहशतीचं वातावरण असून पोलिसांचा वचक कमी झाल्याचं बोललं जात आहे.
नक्की घडलं काय?
मंगळवारी रात्री 12 वाजता हा सगळा प्रकार घडला. विशेष म्हणजे 3 दिवस उलटल्यानंतर सुद्धा याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात याप्रकरणी ना कुठली तक्रार ना कुठला गुन्हा आत्तापर्यंत दाखल झाला आहे. हा सगळा प्रकार नेमक्या कुठल्या वादातून आणि कुठल्या कारणाने घडला? हे अद्याप समजू शकलेले नाही. ही सर्व घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली, ते पुण्यातील वर्दळीचे आणि नामांकित कॅफेंनी भरलेले क्षेत्र आहे. रात्री उशिरापर्यंत येथे तरुणाईची गर्दी असते. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, त्या रात्री अचानक कोयते आणि अन्य शस्त्रे घेऊन काही तरुण आले. दुचाकीवर आलेल्या या तिघांच्या हातात कोयत्यासह धारदार शस्त्र होती.
ट्रेंडिंग
स्वत:च्याच गाडीवर गोळीबार करण्याचं प्रकरण आलं अंगलट
पुण्यात काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या शिवसेना (Shivsena) युवासेनेचे पुणे जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे (Nilesh Ghare) याच्या गाडीवरती मध्यरात्रीच्या सुमारास थेट गोळीबार केल्याची घटना समोर आली होती. या घटनेचा पोलिसांनी तपास केल्यानंतर कारवर फायरिंग झाल्याचा बनाव निलेश घारे यानेच स्वतः रचला असल्याची माहिती समोर आली होती. स्वतःवर बनावट फायरिंग प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचा नेता निलेश घारे याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. वारजे पोलिसांनी घारेवरती अटकेची कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी निलेश घारे याने त्याच्या कारवर फायरिंगचा बनाव रचना होता.
हेही वाचा: