अकोला हादरले! गे-डेटिंग ॲपवरून बँकेच्या अधिकाऱ्याची ओळख, अज्ञात स्थळी बोलवत चौघांकडून लैंगिक अत्याचार, व्हिडीओ रेकॉर्ड करत..
आजकाल डेंटींग ॲप, मॅट्रिमोनिअर साईटवरून होणाऱ्या फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ होत असताना अकोल्यातील या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
Akola Crime: अकोल्यात 'गे-डेटिंग' अँप'द्वारे पुरुषांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. आजकाल 'गे-डेटिंग' अप्स समलिंगी पुरुषांसाठी फसवणुकीचा मोठा अड्डा बनलाय... या ॲपच्या माध्यमातून काही गुन्हेगार ब्लॅकमेलिंग, लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात अडकवत आहे. अकोल्यात देखील 'गे-डेटिंग' ॲपच्या माध्यमातून बँकेच्या एका अधिकाऱ्याची मोठी फसवणूक झाली.. या ॲपवर ओळख करत या अधिकाऱ्याला भेटण्यासाठी अज्ञात स्थळी बोलवण्यत आलं. तिथे चौघांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केलाय. इतकंच नव्हे तर या संपूर्ण घटनेचं मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केले. पुढं बँकेच्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेलिंग करीत तब्बल 80 हजार रुपयांनी आर्थिक फसवणूक केलीय. चौघांपैकी दोघांना पकडण्यात अकोला पोलिसांना यश आले.. मनीष नाईक आणि मयूर बागडे असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
आजकाल डेंटींग ॲप, मॅट्रिमोनिअर साईटवरून होणाऱ्या फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ होत असताना अकोल्यातील या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
ट्रेंडिंग
नेमके घडले काय?
'गे-डेटिंग' ॲपवर ओळख करून दिली आणि त्या माध्यमातून बँक अधिकाऱ्याला जाळ्यात ओढून त्याच्यावर लैंगिक अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणात खदान पोलीस ठाण्याच्या पथकाने दोघा आरोपींना अटक केली असून इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील एका नामांकित बँकेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याची 'गे-डेटिंग' ॲपवर आरोपींशी ओळख झाली. काही दिवस संभाषण झाल्यानंतर आरोपींनी त्या अधिकाऱ्याला शहराबाहेरील एका अज्ञात ठिकाणी भेटीसाठी बोलावलं. ठिकाणी पोहोचताच अधिकाऱ्याला चौघांनी मिळून ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला.या संपूर्ण घटनेचा मोबाईल फोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला. त्यानंतर आरोपींनी अधिकाऱ्याला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग सुरू केली. घाबरलेल्या अधिकाऱ्याकडून 80 हजार रुपये उकळण्यात आले. त्यानंतर त्याने थेट खदान पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत मनीष नाईक आणि मयूर बागडे या दोघा आरोपींना अटक केली आहे. इतर दोन आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक तैनात करण्यात आलं आहे. अकोला पोलिसांनी या घटनेचा गांभीर्याने तपास सुरू केला असून, या प्रकारात आणखी कुणाचा सहभाग आहे का, याची चौकशी सुरू असल्याचं. पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांनी सांगितलं.
हेही वाचा: