Gold-Silver Price: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सोनं-चांदीचे दर घसरले, आजचे दर किती? जाणून घ्या एका क्लिकवर
Gold-Silver Price: सोनं-चांदी स्वस्त झाली आहे. यामुळे लग्नसराईसाठी सोनं-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये गगनाला भिडलेले सोनं-चांदीचे भाव अखेर काहीसे कमी झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता ही सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी तयारी सुरू करा. जळगावच्या सराफ बाजारात सोनं-चांदीच्या दरात तब्बल 3 हजार रुपयांची घसरण झाल्याची माहिती आहे. तर चांदीचे दर हे तब्बल 12 हजार 360 रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे सोनं-चांदी स्वस्त झाली आहे. यामुळे लग्नसराईसाठी सोनं-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या सराफ बाजारात सोनं- चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांतील झालेली ही मोठी घसरण आहे. जळगावात गेल्या तीन दिवसांत सोन्याचे दर हे 3 हजार 113 रूपयांनी घसरले आहेत. तर चांदीचे दर हे तब्बल 12 हजार 360 रुपयांनी कमी झाले आहेत. तीन दिवसांपूर्वी सोन्याचे जीएसटीसह दर 94 हजार 863 रुपये तर चांदीचे दर 1 लाख 5 हजार 60 रुपये होते.
जळगावच्या सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात घसरण झाल्यामुळे आजचे सोन्याचे जीएसटीसहचे दर 91 हजार 670 रुपये एक तोळ्यावर आले आहे. तर चांदीचे दर 92 हजार 700 रुपये प्रति किलो इतके आहेत. त्यामुळे लग्नसराईसाठी सोनं-चांदी खरेदी करण्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्या-चांदीचे दर विक्रमी उच्चांकी किंमतीवर पोहोचले होते. आता सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशातच आता लग्नसराईमुळे सोने खरेदील वेग येण्याची शक्यता आहे.
सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता
आज देशांतर्गत बाजारात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 90,000 रुपये आहे, तर जागतिक बाजारात त्याची किंमत $3,100 पेक्षा जास्त आहे. सुमारे 40 टक्क्यांच्या घसरणीसह, आगामी काळात भारतीय बाजारपेठेत त्याची किंमत 55,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकते. मॉर्निंगस्टारचे रणनीतीकार जॉन मिल्स यांच्या अंदाजानुसार सोन्याची किंमत 3080 डॉलर प्रति औंसवरुन 1820 डॉलर प्रति औंसवर येतील. म्हणजेच सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे.
कशामुळे वाढले सोन्याचे भाव?
सोन्याच्या किमतीत नुकत्याच झालेल्या वाढीमागे आर्थिक अनिश्चितता, महागाईची भीती, भू-राजकीय तणाव, अमेरिकन टॅरिफ इत्यादी अनेक कारणे होती. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी खूप वाढली. मात्र, आता असे अनेक घटक आहेत जे किमती कमी करू शकतात.
किंमत कमी होण्याची शक्यता कशामुळे?
सोन्याचा वाढता पुरवठा- सोन्याच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत, खाणकामातून होणारा नफा प्रति औंस $950 पर्यंत पोहोचेल. सोन्याचा जागतिक साठाही 9 टक्क्यांनी वाढून 2,16,265 टन झाला आहे. ऑस्ट्रेलियाने सोन्याच्या उत्पादनात लक्षणीय वाढ केली आहे आणि पुनर्नवीनीकरण केलेल्या सोन्याचा पुरवठाही वाढला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
