Bank News : बँकेच्या खात्यात 10000 रुपये शिल्लक ठेवावे लागणार,'या'बँकेचा खातेदारांसाठी नवा नियम, अन्यथा 500 रुपये दंड भरावा लागणार
Bank News : डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर इंडियानं खातेदारांसाठी नवा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 1 ऑगस्टापासून खात्यातील किमान शिल्लक 10 हजार रुपये असणं आवश्यक आहे.
नवी दिल्ली : डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर इंडियानं त्यांच्या खातेदारांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. बँकेच्या नियमानुसार बँक खात्यात 10 हजार रुपये किमान शिल्लक नसेल तर दंड द्यावा लागेल. हा दंड 6 टक्क्यांपासून 500 रुपयापर्यंत असेल. बँकेनं या संदर्भातील आदेश जारी केले आहेत.
डीबीएस इंडियाच्या वेबसाईटनुसार 1 ऑगस्टपासून खातेदारांना बँक खात्यात मासिक सरासरी शिल्लक रक्मक 10 हजार रुपये ठेवावी लागेल. ही रक्कम शिल्लक न ठेवल्यास 6 टक्के किंवा 500 रुपये जो अधिक असेल तो दंड आकारला जाईल. डीबीएसनं त्यांच्या खातेदारांना मेसेज करुन माहिती दिली आहे.
ट्रेंडिंग
1 ऑगस्टपासून नियमांची अंमलबजावणी
डीबीएस इंडियानं त्यांच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार 1 ऑगस्ट 2025 नव्या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. सेव्हिंग्ज खातं ज्या प्रकारचं असेल त्या नुसार नॉन- मेंटनन्स चार्ज बदलले जातील. आता खातेदारांना किमान शिल्लक रक्कम खात्यात न ठेवल्यास बँकेकडून जितकं शुल्क आकारलं जाईल ते द्यावं लागेल.
1 मे 2025 पासून एटीएम चार्जेस वाढवले
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं एटीएम चार्जेसमध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली होती. ही वाढ 1 मे 2025 पासून लागू करण्यात आली आहे. आरबीआयच्या अधिसूचनेनंतर डीसीबी बँकेनं मोफत एटीएम व्यवहारांची मुदत संपल्यानंतर प्रत्येक एटीएम व्यवहारावंर 23 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. इतर बँकांकडून देखील मोफत एटीएम व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर प्रति व्यवहा 23 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता.जर तुम्ही डीसीबी बँकेचे खातेदार असाल आणि तुम्ही डीबीएस बँकेच्या एटीएममधून अनेकदा पासे काढले तरी त्यासाठी शुल्क आकारलं जाणार नाही. डीबीएसच्या डेबिट कार्ड द्वारे डीसीबीच्या एटीएम कार्डवरुन अनेकदा पैसे काढू शकता.
डीसीबी बँकेनं दिलेल्या माहितीनुसार आरबीआयनं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या प्रमाणं एटीएममधून मोफत पैसे काढण्याची मर्यादा ओलांडल्यास प्रति व्यवहार 23 रुपयांचं शुल्क द्यावं लागेल. बँकेनं ही माहिती त्यांच्या ग्राहकांना मेलद्वारे दिली होती.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 28 मार्च 2025 रोजी एटीएमचे पूर्ण व्यवहारांची मर्यादा ओलांडल्यानंतर किती शुल्क आकारायचं याबाबत सूचना गेल्या होत्या. मोफत व्यवहारांची मर्यादा ओलांडल्यानंतर 23 रुपये प्रति व्यवहार आकारता येतील, असं आरबीआयनं म्हटलं होतं. नवं शुल्क 1 मे 2025 पासून लागू करण्यात आलं होतं. व्यवहाराच्या रकमेनुसार इतर शुल्क आकारालं जाईल.