Shani Gochar 2025 : 29 मार्चला शनी अमावस्या, 'या' 3 राशींनी राहावं अलर्ट; जाणून घ्या शनी अमावस्येचा 12 राशींवर होणारा परिणाम

Shani Gochar 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, शनीच्या राशी परिवर्तनामुळे काही राशींना लाभ मिळणार आहे तर काही राशींसाठी हा काळ फार आव्हानात्मक असणार आहे.

Continues below advertisement

Shani Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 29 मार्च रोजी म्हणजेच शनिवारी अमावस्या आहे. या दिवशी कर्मफळदाता शनी (Shani Dev) राशी परिवर्तन करणार आहे. या दिवशी शनीचा (Lord Shani) मीन राशीत प्रवेश होणार आहे. त्यामुळे सर्व 12 राशींवर (Zodiac Signs) शनीच्या राशी परिवर्तनाचा कसा परिणाम होणार आहे ते जाणून घेऊयात 

Continues below advertisement

ज्योतिष शास्त्रानुसार, शनीच्या राशी परिवर्तनामुळे काही राशींना लाभ मिळणार आहे तर काही राशींसाठी हा काळ फार आव्हानात्मक असणार आहे. या राशींवर कसा परिणाम होतो ते पाहूयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा दिसेल. या काळात तुम्ही नवीन वस्तू खरेदी करण्याचे योग जुळून येणार आहेत. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

या काळात तुम्ही कार्यात व्यस्त असाल. तसेच, तुमच्या खर्चात वाढ होईल. वैवाहिक जीवनात छोट्या-मोठ्या कुरघोडी असतील. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी हा काळ फार शुभ असेल. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, या काळात तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. 

कर्क रास (Cancer Horoscope)

या काळात तुमच्या घरात वादविवाद वाढू शकतात. या काळात कोणाकडूनही उधारी घेऊ नका. तसेच, तुम्ही केलेल्या कामाच्या प्रती तुम्ही ठाम असणं गरजेचं आहे. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असणार आहे. या काळात तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, धार्मिक कार्यात रुची वाढेल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

शनीच्या राशी परिवर्तनाचा काळ तुमच्यासाठी आव्हानात्मक ठरु शकतो. या कालावधीत तुमच्या कुटुंबात वादविवाद निर्माण होतील. तसेच, कोणताही निर्णय घेताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं मत विचारात घेऊन निर्णय घ्या. 

तूळ रास (Libra Horoscope)

हा काळ तुमच्यासाठी उत्साहाचा असणार आहे. तुम्ही हाती घेतलेली सर्व कामे पूर्ण होतील. तसेच, मित्रांबरोबरचा काळ तुमचा फार आनंदात जाईल. तुम्ही घेतलेले निर्णय यशस्वी होतील. तुम्हाला मुलांच्या बाबतीत शुभवार्ता ऐकायला मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच, अचानक धनलाभ होण्याचा योग संभवतो आहे. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

हा काळ तुमच्यासठी फार चांगला असणार आहे. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण असेल. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा पाहायला मिळेल. तुमच्या कार्यात येणारे अडथळे दूर होतील. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

हा काळ तुमच्यासाठी फार आव्हानात्मक ठरु शकतो. या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. तसेच, मनात अनेक विचार सुरु असतील. 

मकर रास (Capricorn Horoscope)

शनीच्या राशी परिवर्तनाने मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ फार शुभ असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला उच्च अधिकाऱ्यांचा सपोर्ट मिळेल. त्यामुळे तुम्हाला चिंता नसेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

या दरम्यान तुम्हाला कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. तसेच, तुम्ही दान-पुण्य कराल. नोकरीत प्रगतीच्या संधी निर्माण होतील. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या सामाजिक पद-प्रतिष्ठेत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, अचानक धनलाभाचे योग जुळून येणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल.  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:       

Astrology : नीम करोली बाबा यांचं मोठं भाकित! आयुष्यात 'हे' 5 संकेत मिळणं म्हणजे समजा तुमचे 'अच्छे दिन' आलेच...

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »