Shani Dev: कितीही भयंकर संकट येऊ द्या, प्रत्येक वळणावर 'या' राशीला नशीब साथ देतेच! शनिची सर्वात शक्तिशाली राशी माहितीय?

Shani Dev: ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व 12 राशींपैकी शनिची सर्वात शक्तिशाली राशी कोणती आहे? या राशींच्या पाठीशी कसे भक्कम  असतात? जाणून घेऊया...

Continues below advertisement

Shani Dev: आजकाल अनेकांच्या तोंडून आपण ऐकतो.. इथे करा..आणि इथेच भोगा.. याचा अर्थ असा की जे तुम्ही कर्म कराल, त्याचे फळ तुम्हाला जिवंतपणीच भोगावे लागेल, ज्योतिषशास्त्रानुसार, तुमच्या कर्मावर शनिदेवांची करडी नजर असते. तुम्ही कसे वागता? मोठ्यांचा आदर करता की नाही? आपल्याहून खालच्या स्तरातील लोकांना कसे वागवता? श्रीमंत लोकांसाठी सांगायचं झालं तर तुमचे धन तुम्ही साठवून ठेवता की गरिबांना वाटता? अशा प्रत्येक वागणुकीचा हिशोब कधी ना कधी तरी होतोय. हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवांना न्यायदेवता म्हटले जाते. जे व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. शनिची दृष्टी कठोर मानली जात असली तरी, जेव्हा त्यांची कृपादृष्टी होते, किंवा त्यांचा आशीर्वाद असतो, तेव्हा तो व्यक्ती यशाच्या उंचीवर पोहचतो. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवांच्या स्वतःच्या दोन अशा आवडत्या राशी आहेत. या दोन्ही राशींना शनिच्या सर्वात शक्तिशाली राशी मानल्या जातात, ज्या व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक वळणावर साथ देतात आणि त्याला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जातात. ज्योतिषशास्त्रानुसार, जाणून घेऊया, शनिदेव या दोन राशींच्या पाठीशी कसे भक्कम असतात?

Continues below advertisement

मकर

ज्योतिषशास्त्रानुसार, मकर ही अशी राशी आहे आणि त्याचा स्वामी स्वतः शनिदेव आहे. या राशीचे लोक अत्यंत बुद्धिमान, व्यावहारिक आणि मेहनती असतात. मकर राशीचे लोक त्यांच्या करिअरमध्ये अनेकदा मोठी उंची गाठतात कारण ते संयम, शिस्त आणि कठोर परिश्रम यावर विश्वास ठेवतात. म्हणूनच याला कर्माच्या मार्गावर पुढे जाणारे राशी म्हटले जाते. शनिच्या कृपेने मकर राशीच्या लोकांना जीवनात संपत्ती, मालमत्ता आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळते. त्यांची एक कमकुवत बाजू असते, ती म्हणजे अहंकार. जेव्हा शनि वक्री असतो, तेव्हा त्यांनी त्यांच्या वागण्यात नम्रता आणावी, अन्यथा प्रगतीत अडथळे येऊ शकतात.

कुंभ

ज्योतिषशास्त्रानुसार, शनिची दुसरी आणि सर्वात आवडती राशी कुंभ आहे, जी त्यांची मूल त्रिकोण राशी देखील आहे. ही वायु घटक राशी आहे आणि त्यावर शनीचा खोल प्रभाव आहे. कुंभ राशीचे लोक बहुतेकदा खोल विचार करणारे आणि सामाजिक असतात. या लोकांमध्ये नेतृत्व क्षमता, सामाजिक सुधारणा आणि आध्यात्मिक प्रवृत्तीचा विचार करण्याची क्षमता जास्त असते. म्हणूनच या राशीला ज्ञान, कला आणि अध्यात्माचे प्रतीक देखील म्हटले जाते. शनिच्या कृपेने, कुंभ राशीचे लोक केवळ स्वतःसाठीच नाही तर समाजाच्या मोठ्या वर्गासाठी काहीतरी करतात. त्यांचे विचार पारंपारिक विचारांपेक्षा वेगळे असतात, ज्यामुळे त्यांना नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि सर्जनशील क्षेत्रात मोठे यश मिळते.

जेव्हा शनिची कृपा होते, तेव्हा...

जेव्हा शनिची कृपा मकर आणि कुंभ राशीवर पडते तेव्हा व्यक्ती जीवनाच्या प्रत्येक वळणावर साथ देते, आणि सतत प्रगती करते. या राशी कठोर परिश्रम, संयम आणि ज्ञानाचे प्रतीक आहेत. शनि जयंतीच्या या शुभ प्रसंगी, जर तुम्ही देखील या राशींचे असाल तर शनिदेवाची पूजा करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. यामुळे केवळ जीवनाची दिशाच बदलत नाही, तर नशिबाचे दारही उघडू शकते.

हेही वाचा :                          

Lucky Zodiac Sign: आजची 22 जून तारीख अद्भूत! शुभ योगांनी 'या' 5 राशींचे आयुष्य सोन्यासारखं चमकेल, नोकरीत प्रमोशन, उत्पन्नाचे नवे मार्ग..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »