दिल्लीत गेल्या 15 वर्षांपासून अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे (AAP) एकहाती असलेले वर्चस्व झुगारुन लावत मोदी-शाहांचा भाजप राजधानीची सत्ता हस्तगत करणार, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Image Source: pexel

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती.

Image Source: pexel

त्यानंतर चार तासांमध्ये हाती आलेल्या कलांनुसार, सध्याच्या घडीला भाजप 47 आणि आम आदमी पक्ष 23 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस (Congress) पक्षाला साधे खातेही उघडता आलेले नाही.

Image Source: pexel

दिल्लीत सत्तास्थापनेसाठी 37 हा बहुमताचा आकडा आहे. त्यामुळे हे कल कायम राहिल्यास भाजप दिल्लीत सत्ता स्थापन करेल, असे दिसत आहे. हा भाजपच्यादृष्टीने ऐतिहासिक विजय मानला जात आहे.

Image Source: pexel

या विजयामुळे तब्बल 26 वर्षांनी दिल्लीत भाजप सत्तेत येणार आहे. मात्र, भाजपच्या या विजयी घौडदोडीबद्दल आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांनी काही गंभीर आक्षेप उपस्थित केले.

Image Source: pexel

धनंजय शिंदे यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या तीन घटनांचा उल्लेख केला. केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली.

Image Source: pexel

दिल्ली विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी म्हणजे 5 फेब्रुवारीला सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये त्याची जाहिरात देण्यात आली होती.

Image Source: pexel

त्यामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारचे कौतुक करण्यात आले होते. हा अनफेअर गेम आहे, असे धनंजय शिंदे यांनी सांगितले.

Image Source: pexel

याशिवाय, 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत एनडीए सरकारचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये सीतारामन यांनी 12 लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली होती.

Image Source: pexel

निम्नमध्यमवर्गीय आणि सामान्य नोकदारांच्यादृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता. याचा प्रभाव दिल्लीतील मध्यमवर्गीय मतदारांवर पडल्याचा आरोप 'आप'चे नेते धनंजय शिंदे यांनी केला.

Image Source: pexel

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाहीस्नान करण्यासाठी प्रयागराज गाठले.

Image Source: pexel

याठिकाणी मोदींनी संगमावर शाहीस्नान केले. दिल्ली विधानसभेचे मतदान सुरु असताना पंतप्रधान मोदी यांच्या शाहीस्नानाचे लाईव्ह प्रक्षेपण देशभरात सुरु होते.

Image Source: pexel

या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी मतदान सुरु असताना धार्मिक ध्रुवीकरणाचा डाव खेळला, असा आरोप धनंजय शिंदे यांनी केला.

Image Source: pexel
OSZAR »