पावसाळ्यातील रेल्वे प्रवास म्हणजे निसर्गप्रेमींना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी मिळणारी एक पर्वणीच आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Google

रोजच्या धकाधकीच्या जीवनातून निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी

या ७ रेल्वे प्रवासांवर नक्की जा..

Image Source: Google

१. कोकण रेल्वे

मुंबई ते गोवा हा जवळपास ७५६ किमीचा कोकण रेल्वे मार्ग हा गर्द सह्याद्री पर्वतरांग आणि उंच धबधबे टिपण्यासाठीचा एक उत्तम प्रवास ठरू शकतो.

Image Source: Google

२. वास्को द गामा ते लोंडा

या जवळपास १४६ किमीच्या रेल्वे प्रवासादरम्यान तुम्ही जंगल,खोल दऱ्या तसेच प्रसिद्ध दूधसागर धबधबा अनुभवू शकता.

Image Source: Google

३. मांडवी एक्सप्रेस

मुंबई ते मडगाव हा साडे पाचशेहून अधिक किमीचा मांडवी एक्सप्रेसचा पावसाळी प्रवास तुम्हाला सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यातून,कोकणचे सौंदर्य लुटण्यास भाग पाडेल. मांडवी एक्स्प्रेसला कोकण रेल्वेची फूड क्वीन म्हणूनही संबोधले जाते.

Image Source: Google

४. निलगिरी पर्वतीय रेल्वे

पश्चिम घाटातील जवळपास ४६ किमीचा मेट्टुपलयम ते ऊटी या रेल्वे प्रवासात तुम्ही उंच-भरगच्च झाडी, धुक्याची झालर तसेच बोगदे अनुभवू शकता.

Image Source: Google

५. दार्जिलिंग हिमालयीन रेल्वे

जलपाईगुडी ते दार्जिलिंग या ८८ किमीच्या हिमालयीन रेल्वे प्रवासादरम्यान तुम्ही मनमोहक पूर्व हिमालय पाहू शकता. सोबतच हिरवीगार जंगले आणि चहाच्या मळ्यांची विहंगम द़ष्यही अनुभवता येतील.

Image Source: Google

६. कालका-शिमला रेल्वे

जवळपास ९६ किमीचा कालका ते शिमला हा डोंगरी रेल्वे प्रवास तु्म्हाला सुंदर दगडी पूल तसेच पावसाळ्यादरम्यान होणारी हलक्या बर्फवृष्टी चा आनंद देऊ शकतो.

Image Source: Google

७. पुणे-मुंबई रेल्वे

या रेल्वे प्रवासादरम्यान तुम्हाला हिरव्यागार डोंगरझाडीसोबत लोणावळा या थंड हवेचे ठिकाण अनुभवता येईल.

Image Source: Google
OSZAR »