Sharad Pawar News : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरुन पवारांचं भाष्य; म्हणतात, मला माहिती नाही

Continues below advertisement

Sharad Pawar News : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरुन पवारांचं भाष्य; म्हणतात, मला माहिती नाही

 गेल्या काही दिवसांपासून शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना जोर मिळत आहे. या चर्चांना उधाण येण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वी खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच मंचावर एकत्रितपणे दिसून आले होते. त्यानंतर, दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर काही नेत्यांकडून दावे आणि प्रतिदावे करण्यात आले. आता या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर भाष्य केले आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत "मला माहिती नाही", असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola
OSZAR »