Nagpur Central Jail : तुरुंगातूनच गुन्हेगार हालावताहेत सूत्र, 7 जणांविरोधात गुन्हा दाखल
नागपूर पोलिसांनी मध्यवर्ती कारागृहात मोठी कारवाई केलीये. अनेक गुन्हेगार तुरुंगातूनच गुन्हेगारी कारवाया करत असल्याची धक्कादायक बाब समोर आलीये.
जामिनावर सुटलेल्या काही गुन्हेगारांमार्फत तुरुंगात असलेल्या सराईत गुन्हेगारांसाठी अमली पदार्थ तुरुंगाच्या आत पाठवलं जात असल्याचं उघड झालंय.
धक्कादायक बाब म्हणजे तुरुंगाबाहेरुन तुरुंगात अमली पदार्थ नेण्यासाठी तुरुंग प्रशासनातील काही कर्मचारी मदत करत असल्याचंही या कारवाईत उघड झालंय.
तसंच अंमली पदार्थांशिवाय कैदेत असलेल्या गुन्हेगारांसाठी बिर्याणी आणि इतर चमचमीत खाद्य पदार्थ तसेच थंडीच्या दिवसात गरम कपडे पाठवण्यासाठीही तुरुंगातील काही भ्रष्ट कर्मचारी मदत करत होते. दरम्यान या प्रकरणी नागपूर पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा नोंदवला असून त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेण्यात आलंय.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
