Ujjani Water : उजनी धरणाच्या उजव्या कालवा जलसेतुला भलं मोठं भगदाड, लाखो लिटर पाणी वाया
Ujjani Water : उजनी धरणाच्या उजव्या कालवा जलसेतुला भलं मोठं भगदाड, लाखो लिटर पाणी वाया
उजनी उजव्या कालवा जलसेतुला पुन्हा भगदाड .. पुन्हा एकदा रबर पॅकिंग खराब झाल्याने लाखो लिटर पाण्याचा धबधबा सुरू .. उंचावरून पाणी खाली पडून पुन्हा शेतीचे नुकसान होऊ लागले.. . दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून तात्काळ निलंबित करन्याची युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी केली मागणी .. सोलापूर जिल्ह्याला वरदायनी ठरलेले उजनी धरणावरील माळशिरस तालुक्यातील संगम येथे उजनी उजवा कालव्यावरील जलसेतू हा 15 महिन्यांनी परत फुटून लाखो लिटर पाणी वाया जात आहे . 8 नोव्हेंबर 2023 रोजी याच उजनी उजव्या कालव्याची रबर फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले होते . शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते आज तागायत त्या शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नसताना आज पुन्हा पॅकिंग रबर रात्री 1 वाजता तुटून लाखो लिटर पाणी वाया जात आहे .. उजनी जलसेतूच्या 14 नंबर गळ्यातील हे रबर पॅकिंग खराब झाल्याने लाखो लीटर पाणी वाया जात आहे





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
