Pune Commissioner Amitesh Kumar PC : नराधम दत्ता गाडे कसा सापडला? पुणे पोलिसांची UNCUT PC
Pune Commissioner Amitesh Kumar PC : नराधम दत्ता गाडे कसा सापडला? पुणे पोलिसांची UNCUT PC
हे प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात चालवणार आहे आरोपील अटक करण्यास ३ दिवस लागले यामध्ये आमच्या श्नान पथकाने वेगवेगळे स्पॉट्स दाखवले ड्रोन कॅमेर्याने आम्ही त्याचा शोध घेतला त्यानंतर आरोपील ताब्यात घेऊन अटक केली आहे महिलांच्या सुरक्षितप्रश्नी एक आढावा आम्ही परत एकदा घेतलाय डार्क स्पॉट, टेकडी स्पॉट अशा अनेक ठिकाणी आढावा घेतोय ज्या ठिकाणी डार्क स्पॉट आहे तिथे पथदिवे आणि सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय गावाच्या नागरिकांचे आम्ही आभार मानतो आम्ही स्वत जाऊन तिथे त्या गावकर्यांचा सत्कार करणार आहोत या आरोपीला कडक शिक्षा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत ------------------------- अमितेश कुमार - * पाचशे पोलीस आरोपीचा शोध घेत होते. * गुनाट गावातील स्थानिक नागरिकांचे सहकार्य मिळाले. * रात्री एक वाजून दहा मिनीटांनी आरोपीला अटक केली आहे. * तपासासाठी एक पथक स्थापन केले आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवली जाईल. यासाठी विशेष वकिलांची नियुक्ती केली जाईल. * या प्रकरणानंतर शहरातील डार्क स्पॉट्स ची सुरक्षा वाढवण्यात येतेय. * महापालीकेशी बोलून डार्क स्पॉट परिसरात लाईट्स लावण्यात येतील. * आरोपीला अटक करण्यात उशीर झाला. घटना घडल्यावर दोन - अडीच तासात आरोपीची ओळख पटली होती. त्यानंतर पोलीस पथक तिथे गेले मात्र सुरुवातीला आरोपी भेटला नाही. * गुनाट गावातील स्थानिकांनी आरोपीला पकडण्यात खूप सहकार्य केले. त्यांचे खुप खूप आभार. पुणे पोलीसांतर्फे गुनाट गावात जाऊन गावकऱ्यांचे आभार मानण्यात येतील. * गावातील ज्या व्यक्तीने दत्ता गाडेची माहिती दिली त्या व्यक्तीला एक लाखांचे बक्षीस दिले जाईल. * ज्या गुन्हेगारांवर या आधी विनयभंग , बलात्कार यासारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल. आरोपी दत्तात्रय गाडेच्या मानेवर दोरखंडाचे व्रण आढळले आहेत. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता का हे तपासावे लागेल दत्तात्रय गाडे ने आत्महत्येचा प्रयत्न केला पण दोरी तुटली.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
