Jyoti Malhotra Mumbai Connection : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राच्या मुंबई कनेक्शनची चौकशी, 4 वेळा केला होता मुंबई दौरा

Continues below advertisement

Jyoti Malhotra Mumbai Connection : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राच्या मुंबई कनेक्शनची चौकशी, 4 वेळा केला होता मुंबई दौरा

Jyoti Malhotra: यूट्युबर ज्योती मल्होत्रा (Jyoti Malhotra) हिच्या गद्दारीचे एकेक पुरावे रोज समोर येत आहेत. पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या ज्योती मल्होत्रा हिनी अखेर आयएसआयशी संबंधांची दिली कबुली दिली आहे. याचदरम्यान आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्योती मल्होत्राने चारवेळा मुंबई दौरा केल्याचं समोर आलं आहे.

पाकिस्तानची हेर गद्दार ज्योती मल्होत्रा हिने चारवेळा मुंबई दौरा केल्याचं उघड झालं आहे. ज्योती मल्होत्राचा मुंबई दौरा आता तपास यंत्रणांच्या स्कॅनरवर आला आहे. ज्योती मल्होत्राने 2024 मध्ये तीनवेळा तर 2023 मध्ये एकदा मुंबईवारी केली. मुंबईत अनेक भागात तिने फोटो, व्हिडीओ काढले. 2023 मध्ये लालबागचा राजा, तिथली गर्दी, याचा व्हिडीओ तिने काढला. हे व्हिडीओ, फोटो तिने कोणाला पाठवले याचा तपास सुरू आहे. मुंबईतल्या अनेक भागांचे फोटो काढून तिने ते नंतर डिलीट केलेत. ते विशेष डिव्हाईसे पुन्हा रिकव्हर करण्यात आलेत. 

ज्योती मल्होत्राची अखेर कबुली-

पाकिस्तानात अली हसनने आयएसआय अधिकाऱ्यांशी भेट घालून दिली होती. पाकिस्तानातच आयएसआय एजंट शाकीर, राणा शाहबाजचीही भेट घेतली होती. शाकीरचा 923176250069 हा नंबर 'जट रधाँवा' नावे केला सेव्ह होता. शाकीरशी वारंवार चॅटमधून देशाविरोधातली माहिती दिल्याची कबुली गद्दार ज्योती मल्होत्राने दिली आहे. तसेच दानिशच्या मदतीने केल्या पाकिस्तानच्या दोन फेऱ्या मारल्याचं देखील ज्योती मल्होत्राने म्हटलं आहे. मी व्हॉट्सअॅप, स्नॅपचॅट आणि टेलिग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सतत सर्वांशी संपर्कात राहिली आणि देशविरोधी माहितीची देवाणघेवाण करू लागली. मी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात अधिकारी दानिशला अनेक वेळा भेटली, अशी हादरवणारी माहिती ज्योती मल्होत्राने दिली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola
OSZAR »