Brahmos Special Key : ब्रम्होस वापरलं? जैशला ठोकलं? ब्रम्होस वैषिष्टे काय?
Brahmos Special Key : ब्रम्होस वापरलं? जैशला ठोकलं? ब्रम्होस वैषिष्टे काय?
पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारताने केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानचे 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले असून त्यामध्ये कंदहार विमान अपघात आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाईंड युसूफ अझहरचा खात्मा केल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली. भारताने केलेल्या कारवाई पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक ठार झाले असून त्यामध्ये काही अधिकाऱ्यांचाही समावेश आहे अशीही माहिती लष्कराने दिली.
भारताने पाकिस्तानमध्ये हवाई हल्ले करून पहलगाम दहशतवादी हल्ला आणि देशातील इतर हल्ल्यांचा बदला घेतला. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) अंतर्गत ही कारवाई केली. रविवारी (11 मे 2025) पत्रकार परिषदेत DGMO लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी या कारवाईबद्दल अनेक तपशील दिले.
युसूफ अझहर मारला गेला
लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले की, "पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात 9 दहशतवादी अड्ड्यांवर झालेल्या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. त्यात युसूफ अझहर (Yusuf Azhar), अब्दुल मलिक रौफ आणि मुदासिर अहमद सारखे मोठे दहशतवादी होते. हे दहशतवादी आयसी-814 विमानाचे अपहरण आणि पुलवामा बॉम्बस्फोटातही सहभागी होते. लष्कर-ए-तोयबाचे केंद्र असलेल्या आणि अजमल कसाब आणि डेव्हिड हेडलीसारखे दहशतवादी निर्माण करणाऱ्या मुरिदके या ठिकाणाला उद्ध्वस्त केलं."





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
