Corono News : मुंबई महापालिका हद्दीत 53 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, तर पुण्यातही आढळला रुग्ण

Continues below advertisement

Corono News : मुंबई महापालिका हद्दीत 53 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, तर पुण्यातही आढळला रुग्ण

मे महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतेय.. मुंबई महापालिका हद्दीत ५३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत.. मुंबई पाठोपाठ पुण्यातही कोरोनाचा रुग्ण आढळलाय... पुण्यात ८७ वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झालीये... देशभरात एकूण 257 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय.. देशातील कोरोनाची स्थिती नियमंत्रणात असल्याची प्रशासनाने दिलीये..  वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक झाली.. बैठकीत देशभरातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला

सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये रुग्ण वाढले

संयुक्त  राष्ट्रांच्या कोरोनाच्या टास्क फोर्सचे स्ट्रॅटेजिस्ट आणि सार्वजनिक आरोग्य आणि आरोग्य सर्व्हिसेसचे सल्लागार सबाइन कापसी यांनी भारतात कोरोनाची स्थिती  स्थिर आहे. सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी आहे. केरळ, तामिळनाडू या सारख्या राज्यात अधिक तपासणी होत असल्यानं तिथं संख्या अधिक असल्याचं ते म्हणाले. 

कोरोना डॅशबोर्डच्या आकडेवारीनुसार भारतात गेल्या आठवड्यात 58 नव्या रुग्णांची नोंद  झाली आहे. यापैकी 85 टक्के रुग्ण म्हणजेच 46 रुग्ण तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरीमधील आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये देखील वाढली आहे. सिंगापूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संंख्या मे महिन्यात पहिल्या आठवड्यात 28 टक्क्यांनी वाढली आहे. तर, रुग्णसंख्या 14200 वर पोहोचली आहे. हाँगकाँमधील कोरोना रुग्णांचा आकडा समोर आला नसला तरी तिथल्या कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola
OSZAR »