एक्स्प्लोर

RCB vs GT Playing 11 : आरसीबी संघाला गतविजेत्या गुजरातचं आव्हान, घरच्या मैदानावर कशी असेल बंगळुरुची प्लेईंग 11

GT vs RCB IPL 2023 : आयपीएल 2023 च्या 70 व्या सामन्यात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी संघ (RCB) गुजरात टायटन्स (GT) विरोधात उतरणार आहे.

RCB vs GT Playing 11 & Pitch Report : आज आयपीएलमधील (IPL 2023) शेवटच्या साखळी सामन्यात बंगळुरु आणि गुजरात संघ आमने-सामने येणार आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) रविवारी, 21 मे रोजी इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या 70 व्या सामन्यात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरात टायटन्स (GT) विरोधात उतरणार आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दणदणीत विजय नोंदवत रॉयल चॅलेंजर्स आजच्या सामन्यात उतरणार आहे. कर्णधार फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वात (Faf du Plessis) आरसीबी संघ गतविजेत्या गुजरात विरुद्धची आजची लढत जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करेल.

गुजरात आणि बंगळुरु आमने-सामने

दुसरीकडे, गुजरात टायटन्स हा आयपीएल 2023 मधील सर्वात वरचढ संघ आहे. संघ गुणतालिकेत सुरुवातीपासूनच टॉप 4 मध्ये असून प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ आहे. गुजरात संघाने 13 पैकी नऊ सामने जिंकले आहेत. 18 गुणांसह गुजरात पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहेत. त्‍यांच्‍या मागील गेममध्‍ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात हैदराबादचा पराभव करत पहिल्या क्वालिफायर सामन्याचं तिकीट मिळवलं. ते विजयी गतीवर स्वार होऊन रविवारी बंगळुरू संघावर विजय मिळवतील.

M. Chinnaswamy Stadium Pitch Report : चिन्नास्वामी स्टेडियम खेळपट्टीचा अहवाल

आज संध्याकाळी 7.30 वाजता बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे. येथे गोलंदाजांना खास कामगिरी करता आलेली नाही. बंगळुरूमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 170 धावांची आहे. या खेळपट्टीवर अधिक धावा करूनच फलंदाजांवर दबाव आणता येतो. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाचा फायदा होईल.

RCB vs GT Probable Playing 11 : दोन्ही संघांची प्लेईंग 11

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) :

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल, हर्षल पटेल, वेन पारनेल, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज.

गुजरात टायटन्स (GT) :

शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुधारसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, दासून शनाका, राहुल तेवतिया, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

IPL 2023 : RCB संघाला मोठा झटका! 'हा' स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर; गुजरात विरुद्ध सामन्याआधी अडचणी वाढल्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 जून  2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 जून  2025 | रविवार
Bhushi Dam : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भुशी डॅममध्ये दोघे बुडाले, पर्यटनासाठी आले अन् जीव गमावून बसले, पाण्याचा अंदाज न आल्यानं दुर्घटना
पर्यटनासाठी आले अन् जीव गमावला, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भुशी डॅममध्ये दोघे बुडाले
विकेंड गाठून महाबळेश्वरला गेले, शेकडो पर्यटक रस्त्यावरच अडकले, तासन् तास वाहनं एकाच जागेवर, Photos
विकेंड गाठून महाबळेश्वरला गेले, शेकडो पर्यटक रस्त्यावरच अडकले, तासन् तास वाहनं एकाच जागेवर, Photos
Shashank Singh: 'श्रेयस अय्यरनं शिवी दिली, कानाखाली मारली असती तर...' पंजाब किंग्जच्या शशांक सिंहचं नवं वक्तव्य समोर
'श्रेयस अय्यरनं शिवी दिली, कानाखाली मारली असती तर...' पंजाब किंग्जच्या शशांक सिंहचं नवं वक्तव्य समोर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

French Open Champion | 21 वर्षीय कोको गॉफने जिंकले फ्रेंच ओपनचे विजेतेपदNilesh Rane : भीतीपोटी ते एकत्र येणार असतील तर..., निलेश राणे यांची खोचक प्रतिक्रियाOmraje Nimbalkar on Nitesh Rane : विकासनिधी म्हणजे कणकवलीची वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाहीAnandache Paan : गाथा स्वराज्याची..पैलू शिवचरित्राचे..लेखक सदानंद कदम यांच्याशी खास संवाद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 जून  2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 जून  2025 | रविवार
Bhushi Dam : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भुशी डॅममध्ये दोघे बुडाले, पर्यटनासाठी आले अन् जीव गमावून बसले, पाण्याचा अंदाज न आल्यानं दुर्घटना
पर्यटनासाठी आले अन् जीव गमावला, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भुशी डॅममध्ये दोघे बुडाले
विकेंड गाठून महाबळेश्वरला गेले, शेकडो पर्यटक रस्त्यावरच अडकले, तासन् तास वाहनं एकाच जागेवर, Photos
विकेंड गाठून महाबळेश्वरला गेले, शेकडो पर्यटक रस्त्यावरच अडकले, तासन् तास वाहनं एकाच जागेवर, Photos
Shashank Singh: 'श्रेयस अय्यरनं शिवी दिली, कानाखाली मारली असती तर...' पंजाब किंग्जच्या शशांक सिंहचं नवं वक्तव्य समोर
'श्रेयस अय्यरनं शिवी दिली, कानाखाली मारली असती तर...' पंजाब किंग्जच्या शशांक सिंहचं नवं वक्तव्य समोर
हौसेला मोल नाही! कार घ्यायला थेट हेलिकॉप्टरनं एन्ट्री; गाडीची किंमत ऐकून व्हाल थक्क
हौसेला मोल नाही! कार घ्यायला थेट हेलिकॉप्टरनं एन्ट्री; गाडीची किंमत ऐकून व्हाल थक्क
मंत्री राणेंनी डॉक्टरला ऑन द स्पॉट सस्पेंड केलं; आता निर्णय मागे घेण्याची वेळ; नेमकं काय घडलं?
मंत्री राणेंनी डॉक्टरला ऑन द स्पॉट सस्पेंड केलं; आता निर्णय मागे घेण्याची वेळ; नेमकं काय घडलं?
Shivsena : आता अखंड शिवसेना व्हावी, गजानन कीर्तिकरांची भूमिका, शिदेंच्या शिवसेनेतून पहिली प्रतिक्रिया, ज्येष्ठ नेता म्हणाला, कीर्तिकरांचं मत वैयक्तिक...
कीर्तिकरांची भूमिका वैयक्तिक, राज ठाकरे त्या गोष्टी विसरले नसतील, रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
भंडाऱ्यात डीपीसी बैठकीत राडा, आमदार-खासदार भिडले; मोबाईल हिसकावल्याने काँग्रेस नेते संतापले
भंडाऱ्यात डीपीसी बैठकीत राडा, आमदार-खासदार भिडले; मोबाईल हिसकावल्याने काँग्रेस नेते संतापले
Embed widget
OSZAR »