Vaibhav Suryavanshi IPL 2025: पदर्पणाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार टोलावला, बाद होताच रडत रडत गेला; कोण आहे 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी?
IPL 2025 RR vs LSG Vaibhav Suryavanshi: राजस्थान आणि लखनौच्या या सामन्यात सर्वांचं लक्ष वेधलं ते म्हणजे राजस्थानच्या 14 वर्षीय खेळाडू वैभव सूर्यवंशीने...

IPL 2025 RR vs LSG Vaibhav Suryavanshi: आयपीएल 2025 च्या हंगामात काल राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायट्स (IPL 2025 RR vs LSG) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात लखनौ सुपर जायट्सने दोन धावांनी विजय मिळवला. आवेश खानने अखेरच्या षटकात प्रभावी गोलंदाजी करताना राजस्थानचा विजय हिरावून नेला. या विजयासह लखनौने गुणतालिकेत चौथे स्थान गाठले. राजस्थानचा हा सहावा पराभव ठरला.
राजस्थान आणि लखनौच्या या सामन्यात सर्वांचं लक्ष वेधलं ते म्हणजे राजस्थानच्या 14 वर्षीय खेळाडू वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavansh)...वैभव सूर्यवंशीने काल आयपीएलमध्ये पदार्पण केले. यावेळी पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार ठोकत वैभवने सर्वांचं लक्ष वेधले. वैभवने 20 चेंडूत 34 धावा केल्या ज्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता. 14 वर्षे आणि 23 दिवसांच्या वयात वैभव आयपीएलमध्ये खेळणारा सर्वात तरुण खेळाडू बनला. वैभव सूर्यवंशी बाद झाल्यानंतर रडत रडत मैदानाबाहेर गेला.
𝐌𝐀𝐊𝐈𝐍𝐆. 𝐀. 𝐒𝐓𝐀𝐓𝐄𝐌𝐄𝐍𝐓 🫡
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2025
Welcome to #TATAIPL, Vaibhav Suryavanshi 🤝
Updates ▶️ https://t.co/02MS6ICvQl#RRvLSG | @rajasthanroyals pic.twitter.com/MizhfSax4q
आयपीएल मेगा ऑक्शनवेळी वैभव सूर्यवंशी चर्चेत-
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचे नाव सर्वाधिक चर्चेत राहिले होते. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी वैभवला राजस्थान रॉयल्सने 1 कोटी 10 लाख रुपयांना खरेदी केले होते, ज्याची खूप चर्चा झाली होती. आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये एक कोटी रुपयांची बोली लागणारा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी ठरला होता. आयपीएल 2025 साठी राजस्थान रॉयल्सनं 13 वर्षांच्या वैभवसाठी 1.10 कोटी रुपये मोजले होते. वैभव सूर्यवंशीनं आतापर्यंतच्या करिअरमध्ये 5 प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत. तीन मॅचेस लिस्ट ए मध्ये बडोदा विरुद्धची मॅच सोडून, 1 टी 20 मॅच देखील खेळली आहे. प्रथम श्रेणीतील सामन्यांमध्ये त्यानं 100 धावा केल्या आहेत.
कोण आहे वैभव सूर्यवंशी? (Who Is Vaibhav Suryavanshi)
वैभव सूर्यवंशी नाव मराठी वाटतं असलं तरी तो मराठी नाहीये. तो बिहारमधील आहे. बिहारमधील एका छोट्याशा खेड्यात राहणारा वैभव सूर्यवंशी हा भारतातील सर्वात कमी वयात क्रिकेट जगतात एक वेगळी ओळख निर्माण करणारा खेळाडू बनलाय. वैभवचा जन्म 27 मार्च 2011 रोजी बिहारमधील ताजपूर गावात झालाय. वैभवने वयाच्या अवघ्या 4 थ्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. वैभवच्या वडिलांचे नाव संजीव असून ते शेतकरी आहेत, त्यांनी आपल्या मुलाला क्रिकेटर बनवण्यासाठी मोठी मेहनत घेतलीये. वैभव जेव्हा 9 वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला जवळच्या समस्तीपूर येथील क्रिकेट अकादमीत दाखल केले होते. मुलाच्या क्रिकेटसाठी वडिलांना जमीन सुद्धा विकावी लागली होती. यामध्ये वैभवला संधी मिळाली नाही. आता वैभव 14 वर्षांचा आहे. 27 मार्च रोजी त्यांचा वाढदिवस आहे. याच कारणामुळे वयाच्या 13 व्या वर्षी पदार्पण करण्याच्या त्याच्या आशा संपल्या आहेत. वैभवचा जन्म 2011 साली झाला. त्याच वर्षी जेव्हा भारताने 28 वर्षांनी एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.