KKR vs PBKS : अजिंक्य रहाणेची एक चूक केकेआरच्या अंगलट, पंजाबनं विजय खेचून आणला, चहलचा चौकार यशस्वी
PBKS vs KKR : पंजाब किंग्जनं कोलकाता नाईट रायडर्सला 16 धावांनी पराभूत केलं आहे. पंजाबनं 111 धावा केलेल्या तर कोलकाता 95 धावांवर बाद झाला.

चंदीगढ : पंजाब किंग्जनं कोलकाता नाईट रायडर्सला 16 धावांनी पराभूत करत अनोखी कामगिरी केली. 111 एवढ्या कमी धावसंख्येचा पाठलाग करताना कोलता नाईट रायडर्सला 16 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. कोलकाताचा संघ 95 धावांवर बाद झाला. कर्णधार अजिंक्य रहाणे याचा एक निर्णय चूकला आणि त्याचा परिणाम संघाच्या पराभवात झाला. अजिंक्य रहाणे यानं तो बाद झाला तेव्हा डीआरएस घेत असला तर निकाल वेगळा दिसला असता. जे घडलं त्याची अपेक्षा केली नव्हती, जे घडलं त्याची जबाबदारी घेतो, असं अजिंक्य रहाणे म्हणाला.
चहलचा चौकार यशस्वी
पंजाब किंग्जच्या गोलंदाजांनी कडवी झुंज दिली. पहिल्याच ओव्हरपासून पंजाबनं केकेआरवर वर्चस्व गाजवलं. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर सुनील नरेन बाद झाला. यानतर पुढच्या ओव्हरमध्ये क्विंटन डी कॉक बाद झाला. दोन विकेट गेल्यानंतर केकेआरचा कॅप्टन अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी या दोघांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दोघांना युजवेंद्र चहल यानं बाद केलं. त्यानंतर रिंकू सिंग आणि रमणदीप सिंग याला बाद करत चहलनं पंजाबच्या विजयाची शक्यता वाढवली. तर, ग्लेन मॅक्सवेलनं व्यंकटेश अय्यरला बाद केलं. क्विंटन डी कॉक 2, सुनील नरेन 5, अजिंक्य रहाणे 17, अंगकृष रघुवंशी 37, व्यंकटेश अय्यर 7, रिंकू सिंग 2 आणि रमनदीप शुन्यावर बाद झाला. तर, मार्को यानसन यानं पंजाबला आठवी विकेट मिळवून दिली. हर्षित राणा 3 धावा करुन बाद झाला. आंद्रे रसेल 17 धावा करुन बाद झाला आणि पंजाबचा विजय निश्चित झाला.
केकेआरच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी
पंजाब किंग्जचा कॅप्टन श्रेयस अय्यर यानं सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्या सामन्यात पंजाब किंग्जनं 245 धावा केल्या होत्या. त्या मॅचमध्ये पराभव झाला असला तरी श्रेयस अय्यरनं आज देखील टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पंजाबच्य फलंदाजांना संपूर्ण 20 ओव्हर देखील फलंदाजी करता आली नाही. पंजाबचा संघ 15.3 ओव्हरमध्ये 111 धावांवर बाद झाला.पंजाबकडून सर्वाधिक धावा प्रभासिमरन सिंह यानं केल्या. तर, प्रियांश आर्य यानं 22 धावा केल्या. चांगल्या सुरुवातीनंतर पंजाबला हर्षित राणानं एकाच ओव्हरमध्ये दोन धक्के दिले, त्यातून पंजाबचा संघ सावरला नाही. हर्षित राणानं प्रियांश आर्य आणि श्रेयस अय्यरला बाद केलं. यानंतर पंजाबचे इतर फलंदाज वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेनच्या गोलंदाजीपुढं टिकाव धरु शकले नाहीत. यामुळं पंजाबचा संघ 111 धावांवर बाद झाला.
दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सकडून हर्षित राणानं 3, वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेननं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. केकेआरच्या गोलंदाजांनी सलग दुसऱ्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली.
कोलकाता नाइट राइडर्स : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कॅप्टन), वेंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, हर्षित राणा, वैभव अरोरा, एनरिक नॉर्तजे, वरुण चक्रवर्ती
पंजाब किंग्ज : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कॅप्टन), नेहल वढेरा, जोश इंग्लिस, शशांक सिंह, ग्लेन मॅक्सवेल, मार्को जानसन, जेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल