एक्स्प्लोर

IPL 2023 Transfers : शार्दूल ठाकूर आता केकेआरच्या संघात, आयपीएल 2023 च्या मिनी ऑक्शनपूर्वी दिल्लीनं केलं ट्रेड

IPL 2023 Auction : आयपीएल 2023 (IPL 2023 ) हंगामासाठी मिनी ऑक्शन 23 डिसेंबर रोजी पार पडणार असून यापूर्वी सर्व संघाना त्यांच्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करायची आहेत.

IPL 2023 Auction : इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल (IPL) 2023) साठीचा लिलाव (IPL 2023 Auction) 23 डिसेंबरला कोची इथे पार पडणार आहे. या भव्य स्पर्धेसाठी यंदा मिनी ऑक्शन होणार असून यावेळी संघामध्ये काही बदल नक्कीच पाहायला मिळतील. दरम्यान सध्या या ऑक्शनपूर्वी सर्व संघाना त्यांच्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करायची आहेत. दरम्यान ऑक्शनसाठी आपल्या पर्समध्ये अधिक पैसे शिल्लक ठेवण्यासाठी संघ काही खेळाडूंना रिलीज करत असून नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार दिल्ली संघाने स्टार ऑलराऊंडर शार्दूलला रिलीज केलं असून केकेआर संघाने त्याला आपल्यासोबत जोडल्याची माहिती समोर येत आहे. ईएसपीएनने (ESPN) ही माहिती दिली आहे.  

शार्दूलला संघात घेण्यासाठी कोलकात्यासोबत चेन्नई, गुजरात आणि पंजाब हे संघही प्रयत्न करत होते. पण अखेर केकेआरने शार्दूलला संघात घेण्यात यश मिळवलं आहे. आयपीएल 2022 मध्ये शार्दूलने चांगली अष्टपैलू कामगिरी केली होती. 14 सामन्यात त्याने 15 विकेट्स घेत 120 धावाही केल्या होत्या. दरम्यान एका दमदार अष्टपैलू खेळाडूच्या येण्याने केकेआर संघाची ताकद वाढणार हे नक्की. 

कोचीमध्ये होणार मिनी लिलाव 

पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये आयपीएलचा 16 व्या हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामासाठी 23 डिसेंबर रोजी कोचीमध्ये मिनी लिलाव होणार आहे. बीसीसीआयने सर्व आयपीएल संघांना 15 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या कायम ( Retained Players ) ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्यास सांगितलं आहे.

आयपीएल पुन्हा Home Away Format मध्ये

आगामी आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेसंबधित बीसीसीआयने एक नवी घोषणा केली होती.  तत्कालीन माजी अध्यक्ष गांगुली म्हणाले होते, ''मागील दोन वर्षे कोरोनामुळे आयपीएल नेहमीसारखी होत नव्हती, पण आता आयपीएल पुन्हा जुन्या ढंगात होणार आहे. ज्यामुळे आता प्रत्येक संघ आपले सात सामने घरच्या मैदानात तर उर्वरीत सात सामने प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानात खेळणार आहे.'' टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ''पुरुषांच्या आयपीएलचा आगामी हंगाम पहिल्याप्रमाणे होम आणि अवे फॉरमॅटमध्ये होणार आहे. ज्यामुळे सर्व दहा संघ त्यांचे 7 सामने घरच्या मैदानात तर उर्वरीत 7 सामने प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानात खेळणार आहेत. तसंच सध्या बीसीसीआय बहुप्रतिक्षित महिला आयपीएलवर काम करत आहे. आम्ही पुढच्या वर्षी पहिला हंगाम सुरू करण्याची शक्यता आहे.” 

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डी साई संस्थानकडे किती किलो सोनं, एकूण किंमत किती? सीईओ गाडीलकरांनी दिली माहिती
शिर्डी साई संस्थानकडे किती किलो सोनं, एकूण किंमत किती? सीईओ गाडीलकरांनी दिली माहिती
Monsoon Rain: मान्सून राज्यात कधी येणार? समोर आली महत्त्वाची अपडेट; पुणे वेधशाळेचं भाकीत
मान्सून राज्यात कधी येणार? समोर आली महत्त्वाची अपडेट; पुणे वेधशाळेचं भाकीत
Indian Army ends terrorists: काश्मीरमध्ये पाकड्यांच्या कुरापती सुरुच, भारतीय सैन्याने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं
भारतीय सैन्यदलाने काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं, शोपियानच्या जंगलात सर्च ऑपरेशन
मोठी बातमी! कृत्रिम वाळू धोरणास मंजुरी, फिरते पथक योजना; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 6 महत्त्वाचे निर्णय
मोठी बातमी! कृत्रिम वाळू धोरणास मंजुरी, फिरते पथक योजना; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 6 महत्त्वाचे निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Monsoon Rain : गुडन्यूज! मान्सून अंदमानात दाखल,  महाराष्ट्रात कधी?ABP Majha Headlines : 01 PM : 13 May 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 News : टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट करावा एका क्लिकवर : 13 May 2025 : 12 PM : ABP MajhaSanjay Gaikwad On Rakhi Sawant : राखी सावंतला पाकिस्तानात गाडलं  पाहिजे - संजय गायकवाड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डी साई संस्थानकडे किती किलो सोनं, एकूण किंमत किती? सीईओ गाडीलकरांनी दिली माहिती
शिर्डी साई संस्थानकडे किती किलो सोनं, एकूण किंमत किती? सीईओ गाडीलकरांनी दिली माहिती
Monsoon Rain: मान्सून राज्यात कधी येणार? समोर आली महत्त्वाची अपडेट; पुणे वेधशाळेचं भाकीत
मान्सून राज्यात कधी येणार? समोर आली महत्त्वाची अपडेट; पुणे वेधशाळेचं भाकीत
Indian Army ends terrorists: काश्मीरमध्ये पाकड्यांच्या कुरापती सुरुच, भारतीय सैन्याने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं
भारतीय सैन्यदलाने काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं, शोपियानच्या जंगलात सर्च ऑपरेशन
मोठी बातमी! कृत्रिम वाळू धोरणास मंजुरी, फिरते पथक योजना; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 6 महत्त्वाचे निर्णय
मोठी बातमी! कृत्रिम वाळू धोरणास मंजुरी, फिरते पथक योजना; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 6 महत्त्वाचे निर्णय
अंगावर पिणारं बाळ, वर्षभराच्या चिमुकल्याला सोडून आई सीमेवर निघाली, महाराष्ट्राच्या वाघिणीला देशाचा सलाम!
अंगावर पिणारं बाळ, वर्षभराच्या चिमुकल्याला सोडून आई सीमेवर निघाली, महाराष्ट्राच्या वाघिणीला देशाचा सलाम!
Swami Govindgiri Maharaj : पंतप्रधान मोदी योग्य दिशेने जाताय, लवकरच ते POK ताब्यात घेतील; स्वामी गोविंदगिरी महाराजांना ठाम विश्वास
मोदींच्या निर्णयाला विरोध करणारे पाकिस्तानधार्जिणे, परकीय लोकांचे हस्तक; स्वामी गोविंदगिरी महाराजांची विरोधकांवर टीका
इस्रायलने गाझामधील मेडिकल कॉम्प्लेक्स अन् विद्यापीठाच्या इमारतीवर बॉम्ब टाकले, एका पत्रकारासह 39 जणांचा मृत्यू
इस्रायलने गाझामधील मेडिकल कॉम्प्लेक्स अन् विद्यापीठाच्या इमारतीवर बॉम्ब टाकले, एका पत्रकारासह 39 जणांचा मृत्यू
मोठी बातमी! शस्त्रसंधीनंतर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी घुसले, भारतीय सैन्याने परिसराला घातला वेढा
मोठी बातमी! शस्त्रसंधीनंतर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी घुसले, भारतीय सैन्याने परिसराला घातला वेढा
Embed widget
OSZAR »