CSK vs DC IPL 2025 : पुन्हा नाही चालली माहीची जादू, दिल्ली कॅपिटल्सने सीएसकेचा किल्ला जिंकला, विजयी हॅटट्रिक

CSK vs DC Updates IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या 17 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळत आहेत.

Continues below advertisement

LIVE

Background

Chennai Super Kings vs Delhi Capitals Updates 2025 : फलंदाजांनंतर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जला 25 धावांनी पराभूत केले. दिल्लीचा हा सलग तिसरा विजय आहे आणि आयपीएल 2025 मध्ये त्यांची अपराजित मोहीम सुरूच आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत सहा गडी गमावून 183 धावा केल्या. प्रत्युत्तरात, सीएसकेला 20 षटकांत पाच गडी गमावून फक्त 158 धावा करता आल्या. सीएसकेचा हा सलग तिसरा पराभव आहे.  

Continues below advertisement
19:17 PM (IST)  •  05 Apr 2025

चेन्नई सुपर किंग्ज चेपॉकमध्ये पुन्हा पराभव... दिल्ली कॅपिटल्सची विजयी हॅटट्रिक

फलंदाजांनंतर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जला 25 धावांनी पराभूत केले. दिल्लीचा हा सलग तिसरा विजय आहे आणि आयपीएल 2025 मध्ये त्यांची अपराजित मोहीम सुरूच आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत सहा गडी गमावून 183 धावा केल्या. प्रत्युत्तरात, सीएसकेला 20 षटकांत पाच गडी गमावून फक्त 158 धावा करता आल्या. सीएसकेचा हा सलग तिसरा पराभव आहे. याआधी, त्यांना राजस्थान रॉयल्स आणि आरसीबीविरुद्धही पराभव पत्करावा लागला होता.

18:38 PM (IST)  •  05 Apr 2025

चेन्नईचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये, जडेजाही आऊट

दिल्लीविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जची फलंदाजी ढासळली आहे आणि त्यांनी 74 धावांवर पाच विकेट गमावल्या आहेत.

18:38 PM (IST)  •  05 Apr 2025

सीएसकेला चौथा धक्का

विपराज निगमने शिवम दुबेला बाद करून सीएसकेला चौथा धक्का दिला. शिवम 15 चेंडूत एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 18 धावा काढून बाद झाला.

18:37 PM (IST)  •  05 Apr 2025

कॉनवे तंबुत

विपराज निगमने डेव्हॉन कॉनवेला बाद करून सीएसकेला तिसरा धक्का दिला आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेची सुरुवात चांगली झाली नाही. कारण त्यांनी पॉवरप्लेमध्येच तीन विकेट गमावल्या. 14 चेंडूत 13 धावा करून कॉनवे आऊट झाला.  

18:36 PM (IST)  •  05 Apr 2025

कॅप्टन ऋतुराजही आऊट

ऋतुराजच्या रूपाने चेन्नईला दुसरा धक्का बसला. दिल्लीविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना, सीएसकेची सुरुवात चांगली झाली नाही आणि संघाने 20 धावांच्या आत दोन विकेट गमावल्या.

18:36 PM (IST)  •  05 Apr 2025

सीएसकेला पहिला धक्का

चेन्नईला पहिला धक्का 14 धावांवर बसला. रचिन रवींद्र तीन धावा करून बाद झाला.  

17:18 PM (IST)  •  05 Apr 2025

केएल राहुलची तुफानी खेळी... दिल्लीने चेन्नईसमोर ठेवले इतक्या धावांचे लक्ष्य

केएल राहुलच्या अर्धशतकाच्या मदतीने दिल्ली कॅपिटल्सने सीएसकेसमोर 184 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि राहुलने 51 चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 77 धावा केल्या, ज्याच्या मदतीने दिल्लीने 20 षटकांत सहा गडी गमावून 183 धावा केल्या.

17:15 PM (IST)  •  05 Apr 2025

मुकेश चौधरीला 19 व्या षटकात दिल्लीने ठोकल्या 15 धावा

मुकेश चौधरीला 19 व्या षटकात दिल्लीने 15 धावा ठोकल्या. 19 षटकांनंतर, दिल्ली कॅपिटल्सचा स्कोअर 4 बाद 176 धावा आहे. 


 

16:56 PM (IST)  •  05 Apr 2025

खलील अहमदचा कहर, दिल्ली कॅपिटल्सचा चौथा धक्का! दिल्लीच्या किती झाल्या धावा?

17 व्या षटकात दिल्ली कॅपिटल्सला 146 धावांवर चौथा धक्का बसला आहे. समीर रिझवी 15 चेंडूत 20 धावा करून बाद झाला. समीरला खलील अहमदने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ही त्याची दुसरी विकेट होती.

16:52 PM (IST)  •  05 Apr 2025

राहुल-रिझवी यांच्यात 50+ धावांची भागीदारी

केएल राहुल आणि समीर रिझवी यांनी चौथ्या विकेटसाठी 50+ धावांची भागीदारी पूर्ण केली आहे. 16 षटकांनंतर दिल्लीचा स्कोअर तीन बाद 146 धावा आहे. केएल राहुल चांगली फलंदाजी करत आहे आणि अर्धशतक झळकावल्यानंतर क्रीजवर खंबीरपणे उभा आहे.

16:51 PM (IST)  •  05 Apr 2025

सीएसकेविरुद्ध केएल राहुलने ठोकले अर्धशतक

केएल राहुलने सीएसकेविरुद्ध 33 चेंडूत अर्धशतक ठोकले आहे. राहुलचा या हंगामातील हा पहिलाच अर्धशतक आहे आणि त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 38 वा अर्धशतक आहे.  

16:50 PM (IST)  •  05 Apr 2025

नूर अहमदने दिल्लीला दिला तिसरा धक्का

नूर अहमदने अक्षर पटेलला बाद करून दिल्ली कॅपिटल्सला तिसरा धक्का दिला आहे. अक्षर चांगली फलंदाजी करत होता आणि केएल राहुलसोबत भागीदारी करत होता, पण नूरने त्याला आऊट केलं. अक्षर 14 चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 21 धावा काढून बाद झाला. 11 षटकांच्या अखेरीस दिल्लीने तीन विकेट गमावून 92 धावा केल्या आहेत.

16:22 PM (IST)  •  05 Apr 2025

दिल्लीचा स्कोअर 90 पार

दिल्ली कॅपिटल्सचा CSK विरुद्धचा धावसंख्या 90 पुढे गेली आहे. सध्या केएल राहुल आणि अक्षर पटेल क्रीजवर आहेत. 10 षटकांनंतर, दिल्लीचा स्कोअर दोन बाद 90 धावा आहे.

16:20 PM (IST)  •  05 Apr 2025

दिल्लीला दुसरा धक्का, अभिषेक पोरेल OUT, दिल्लीच्या किती झाल्या धावा?

पॉवर प्ले संपल्यानंतर रवींद्र जडेजाने दिल्ली कॅपिटल्सला दुसरा धक्का दिला. अभिषेक पोरेल आणि केएल राहुल दुसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी करत होते पण जडेजाने ती मोडून काढली. राहुल आणि पोरेल यांनी 54 धावा जोडल्या. पोरेल 20 चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 33 धावा काढून बाद झाला.

16:00 PM (IST)  •  05 Apr 2025

अभिषेक पोरेलचा तडाखा

खराब सुरुवानंतर अभिषेक पोरेलने दिल्ली कॅपिटल्सची जबाबदारी स्वीकारली. दिल्लीने पहिल्याच षटकात मॅकगर्कची विकेट गमावली पण अभिषेकने काही शानदार फटकेबाजी केली ज्यामुळे तीन षटकांच्या शेवटी दिल्लीचा धावसंख्या एका विकेटच्या मोबदल्यात 24 धावांवर पोहोचला. अभिषेक व्यतिरिक्त, केएल राहुल देखील क्रीजवर उपस्थित आहे.

15:58 PM (IST)  •  05 Apr 2025

खलील अहमदने पहिल्याच षटकात दिल्लीला दिला पहिला धक्का!

खलील अहमदने पहिल्याच षटकात जॅक फ्रेझर मॅकगर्कला बाद करून दिल्लीला सुरुवातीचा धक्का दिला. पाच चेंडू खेळल्यानंतर मॅकगर्क खाते न उघडताच बाद झाला. खलीलच्या चेंडूवर मॅकगर्कने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण 30 यार्डच्या वर्तुळात उभ्या असलेल्या अश्विनने तो झेल घेतला.

15:09 PM (IST)  •  05 Apr 2025

चेन्नई आणि दिल्लीची आकडेवारी

चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये एकूण 30  सामने खेळले गेले आहेत. यामध्ये चेन्नईचा वरचष्मा आहे. चेन्नई सुपर किंग्जने दिल्लीला 19  वेळा हरवले आहे तर दिल्लीने एमएस धोनीच्या संघाला 11 वेळा हरवले आहे.

15:09 PM (IST)  •  05 Apr 2025

एमए चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी

एमए चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करते. दुसऱ्या डावात खेळपट्टी थोडी संथ होऊ शकते. कारण दुपारी खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात दव अडथळा ठरणार नाही. प्रथम फलंदाजी करताना, येथे 190  धावा करणे चांगले होईल.

15:08 PM (IST)  •  05 Apr 2025

दिल्ली कॅपिटल्स संघाची प्लेइंग-11

जेक फ्रेझर-मॅकगर्क, केएल राहुल, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, समीर रिझवी, अक्षर पटेल, आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा

15:08 PM (IST)  •  05 Apr 2025

चेन्नई सुपर किंग्ज संघाची प्लेइंग-11 :

रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, विजय शंकर, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मुकेश चौधरी, खलील अहमद, मथीशा पाथिराना

15:04 PM (IST)  •  05 Apr 2025

चेन्नईविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सने जिंकली नाणेफेक! घेतला मोठा निर्णय

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसकेसाठी दिलासा देणारी गोष्ट म्हणजे त्यांचा नियमित कर्णधार तंदुरुस्त आहे आणि तो या सामन्यात खेळत आहे. या सामन्यासाठी दिल्लीने एक बदल केला आहे आणि फाफ डू प्लेसिसच्या जागी समीर रिझवीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे.

Sponsored Links by Taboola
OSZAR »