RCB vs SRH IPL 2025 : फिल साल्टचे वादळी अर्धशतक पाण्यात... सनरायझर्स हैदराबादचा आरसीबीवर धमाकेदार विजय

RCB vs SRH Live Updates : आयपीएल 2025 मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना खेळला जात आहे.

Continues below advertisement

Background

Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad Live Updates : आयपीएल 2025 मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना खेळला जात आहे. या हंगामातील हा 65 वा सामना आहे. सनरायझर्स हैदराबाद संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या कारणास्तव, या सामन्याचा त्याच्यासाठी फारसा अर्थ नाही. पण, आरसीबीसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. जर आरसीबीला टॉप-2 मध्ये आपले स्थान निश्चित करायचे असेल, तर त्यांना हा सामना जिंकावा लागेल.

नवीन कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीची कामगिरी चालू हंगामात चांगली राहिली आहे. बंगळुरूने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत, त्यापैकी 8 जिंकले आहेत आणि 3 गमावले आहेत. अशा प्रकारे आरसीबी 17 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी फक्त 4 जिंकले आहेत, तर 7 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Continues below advertisement
23:43 PM (IST)  •  23 May 2025

सनरायझर्स हैदराबादचा आरसीबीवर धमाकेदार विजय

सनरायझर्स हैदराबादने आरसीबीचा 42 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्सने इशान किशनच्या दमदार खेळीच्या जोरावर 20 षटकांत सहा गडी गमावून 231 धावा केल्या. फिल साल्ट आणि विराट कोहली यांनी संघाला चांगली सुरुवात दिली, परंतु आरसीबी 19.5 षटकांत 189 धावांवर सर्वबाद झाला. आरसीबीने आधीच प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे. पण या पराभवामुळे अव्वल दोन संघांमध्ये स्थान पक्के करण्याच्या त्यांच्या संधींना धक्का बसला आहे.


कोहली आणि साल्ट यांनी पहिल्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. कोहली आऊट झाल्यानंतर सॉल्टने जबाबदारी घेतली आणि अर्धशतकही झळकावले. सॉल्ट आऊट झाल्यानंतर, आरसीबीनी नियमित अंतराने विकेट गमावण्यास सुरुवात केली. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले. यामध्ये सर्वात मोठे योगदान इशान मलिंगाचे होते, ज्याने रोमारियो शेफर्ड आणि टिम डेव्हिड सारख्या स्फोटक फलंदाजांचे बळी घेतले.

21:34 PM (IST)  •  23 May 2025

इशानचे शतक हुकले, सनरायझर्स हैदराबादने आरसीबीसमोर ठेवले 232 धावांचे लक्ष्य

इशान किशनच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने आरसीबीसमोर 232 धावांचे लक्ष्य ठेवले. इशानने 48 चेंडूत सात चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद 94 धावा केल्या, ज्यामुळे सनरायझर्स संघ 20 षटकांत सहा गडी बाद 231 धावा करण्यात यशस्वी झाला. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी करत त्यांना वेगवान सुरुवात दिली.


17 चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांसह 34 धावा करणाऱ्या अभिषेकला आऊट करून लुंगी एनगिडीने ही भागीदारी मोडली. यानंतर भुवनेश्वर कुमारने ट्रॅव्हिस हेडला पॅव्हेलियनमध्ये पाठवले, ज्याने 10 चेंडूत तीन चौकारांसह 17 धावा केल्या. यानंतर, क्लासेन आणि इशान किशन यांनी जबाबदारी स्वीकारली आणि तिसऱ्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. सुयश शर्माने क्लासेनला आऊट करून ही भागीदारी मोडली, ज्याने 13 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांसह 24 धावा केल्या.


यानंतर, अनिकेत वर्मा ईशानला साथ दिली. अनिकेतने नऊ चेंडूत एका चौकार आणि तीन षटकारांसह 26 धावा काढल्यानंतर आऊट झाला. या सामन्यात नितीश रेड्डी प्रभावित करू शकला नाही आणि चार धावा काढल्यानंतर रोमारियो शेफर्डने त्याला आऊट केले. त्यानंतर शेफर्डने अभिनव मनोहरला आऊट केले, जो 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. इशानच्या फलंदाजीच्या जोरावरच सनरायझर्सना 230 धावांचा टप्पा ओलांडता आला.

19:33 PM (IST)  •  23 May 2025

आरसीबी संघाची प्लेइंग-11

फिल सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, लुंग एनगिडी, सुयश शर्मा.

19:33 PM (IST)  •  23 May 2025

सनरायझर्स हैदराबाद संघाची प्लेइंग-11

अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट.

19:32 PM (IST)  •  23 May 2025

आरसीबीने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीचा नियमित कर्णधार रजत पाटीदार या सामन्यात खेळत नाहीये आणि त्याच्या जागी जितेश शर्मा जबाबदारी सांभाळत आहे. जितेश पहिल्यांदाच आरसीबीचे नेतृत्व करत आहे. यापूर्वी त्याने सनरायझर्सविरुद्ध पंजाब किंग्जचे नेतृत्व केले होते.  

Sponsored Links by Taboola
OSZAR »