Yuzvendra Chahal : 18 कोटींवरुन मापं काढली, युजवेंद्र चहलनं मॅच फिरवली, प्रिती झिंटाकडून मिठी मारत अभिनंदन
Preity Zinta hugs Yuzvendra Chahal : पंजाब किंग्जच्या सहमालक प्रिती झिंटा यांनी दमदार कामगिरी करणाऱ्या युजवेंद्र चहलचं मिठी मारत अभिनंदन केलं.
Continues below advertisement
प्रिती झिंटानं मारली चहलला मिठी
Continues below advertisement
1/7
आयपीएलमधील 31 वी मॅच रोमहर्षक ठरली. पहिल्यांदा कोलकाताच्या गोलंदाजांनी पंजाबला 111 धावांवर रोखलं. तर, पंजाबच्या गोलंदाजांनी केकेआरला 95 धावांवर रोखत विजय मिळवला. यामध्ये युजवेंद्र चहलची कामगिरी महत्त्वाची ठरली.
Continues below advertisement
2/7
युजवेंद्र चहलनं केकेआरच्या फलंदाजीला सुरुंग लावला. कॅप्टन अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी यांची 50 धावांची भागीदारी मोडण्यात चहलला यश आलं. अजिंक्य रहाणेला त्यानं 17 धावांवर बाद केलं.
3/7
युचवेंद्र चहलनं अजिंक्य रहाणे 17, अंगकृष रघुवंशी 37, रिंकू सिंग 2 आणि रमणदीप सिंगला शुन्यावर बाद केलं.
4/7
युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर रसेलनं फटकेबाजी केली. मात्र, रसेल केकेआरला विजय मिळवून देऊ शकला नाही.
5/7
पंजाबच्या विजयात श्रेयस अय्यरची भूमिका देखील महत्त्वाची ठरली. कारण, गेल्या काही सामन्यांमध्ये अपयशी ठरलेल्या चहलवर त्यानं विश्वास दाखवला.
6/7
युजवेंद्र चहलला पंजाब किंग्जनं 18 कोटी देत खरेदी केलं होतं. यापूर्वीच्या सामन्यांमध्ये त्यानं चांगली कामगिरी केली नसल्यानं तो टीकाकारांच्या निशाण्यावर आला होता.
7/7
युजवेंद्र चहलनं 4 विकेट घेत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. संघाची सहमालक प्रिती झिंटा हिनं मॅचनंतर चहलला मिठी मारत त्याचं अभिनंदन केलं.
Published at : 15 Apr 2025 11:51 PM (IST)