MS Dhoni On Retirement: चेन्नईने शेवटचा सामना खेळला; हर्षा भोगलेंचा निवृत्तीचा प्रश्न अन् MS धोनीचं बुचकाळ्यात टाकणारं उत्तर, काय म्हणाला?

MS Dhoni On Retirement: चेन्नईने यंदाच्या गुजरातविरुद्ध यंदाच्या हंगामातील शेवटचा सामना खेळला. यावेळी सामना संपल्यानंतर हर्षा भोगले यांनी एमएस धोनीला आयपीएलमधील निवृत्तीबाबत प्रश्न विचारला.

Continues below advertisement

MS Dhoni On Retirement

Continues below advertisement
1/9
MS Dhoni On Retirement: चेन्नईने यंदाच्या आयपीएलमधून विजयी सांगता करताना आपल्या अखेरच्या सामन्यात गुजरातचा 83 धावांनी धुव्वा उडविला.
2/9
या विजयानंतरही चेन्नईला गुणतालिकेतील तळाचे स्थान टाळता आले नाही. दुसरीकडे, गुणतालिकेत अव्वल दोन स्थानी राहण्यासाठी गुजरातला आता इतर सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.
3/9
प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकांत 5 बाद 230 धावा उभारल्यानंतर गुजरातला 18.3 षटकांत 147 धावांवर गुंडाळले.
4/9
चेन्नईने यंदाच्या गुजरातविरुद्ध यंदाच्या हंगामातील शेवटचा सामना खेळला. यावेळी सामना संपल्यानंतर हर्षा भोगले यांनी एमएस धोनीला आयपीएलमधील निवृत्तीबाबत प्रश्न विचारला.
5/9
निवृत्तीबाबतच्या प्रश्नावर एमएस धोनीने पु्न्हा बुचकाळ्यात टाकणारे उत्तर दिले. निर्णय घेण्यासाठी माझ्याकडे 4-5 महिने आहेत, घाई नाही. शरीर तंदुरुस्त ठेवणे महत्वाचे आहे, असं एमएस धोनीने सांगितले.
Continues below advertisement
6/9
एमएस धोनीच्या या उत्तरावर हर्षा भोगले यांनी तर तुम्ही निवृत्त होत नाहीय?, असा प्रश्न विचारला.
7/9
हर्षा भोगले यांच्या या प्रश्नावर एमएस धोनी म्हणाला की, मी असे म्हणत नाहीये की मी आता निवृत्त होत आहे, आणि मी असेही म्हणत नाहीये की मी परत येत आहे.
8/9
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतरही धोनी यांनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचे नेतृत्व सुरू ठेवले.
9/9
आयपीएल 2025 च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सविरुद्ध 83 धावांनी विजय मिळवून आपला हंगाम संपवला . धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने चांगली कामगिरी केली, परंतु CSK गुणतालिकेत तळात राहिला.
Sponsored Links by Taboola
OSZAR »