एक्स्प्लोर
Pakistan Train Hijack आधी स्फोट, नंतर रेल्वेचं अपहरण; पाकिस्तान 'जाफर एक्सप्रेस हायजॅक' करतानाचा व्हिडिओ अन् फोटो समोर
Pakistan Train Hijack पाकिस्तानमधील बलूच आर्मीकडून पाकिस्तानच्या जफार एक्सप्रेसचं अपहरण करण्यात आल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. यात आत्तापर्यंत पाकिस्तानी जवानांसह 20 जण ठार झाल्याची माहिती आहे.

Pakistan train highjack by BLA army
1/8

पाकिस्तानमधील बलूच आर्मीकडून पाकिस्तानच्या जफार एक्सप्रेसचं अपहरण करण्यात आल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. या अपहरण प्रकरणात आत्तापर्यंत 20 पाकिस्तानी जवानांना ठार करण्यात आल्याची माहिती आहे.
2/8

क्वेटा सैन्य एअरपोर्ट आणि स्थानिक रुग्णालयातून 40 रुग्णवाहिका आणि 12 पेक्षा जास्त हेलिकॉप्टर ट्रेनच्या लोकेशनजवळ पोहोचविण्यात आल्याची माहिती आहे.
3/8

बलूच आर्मीने जफार एक्सप्रेसचे अपहरण करताना मोठ्या प्रमाणात गोळीबार केला, त्यामध्ये एक्सप्रेसच्या पुढील बाजूस स्फोट झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
4/8

स्फोट झाल्यानंतर बलूच आर्मीने ट्रेनला वेढा देत ट्रेन हायजॅक केली. त्यावेळी, पाकिस्तानच्या 6 जवानांना ठार मारलं होत. आत्तापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला असून 182 प्रवाशांना ओलीस ठेवलं आहे.
5/8

स्वतंत्र बलूचिस्तानच्या मागणीसाठी पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान आर्मीकडून अशा घटना घडवून आणल्या जात आहेत. त्यातच, आज पाकिस्तानी सैन्य, आयएसआयचे अधिकारी, अँटी टेरिरिस्ट स्क्वॉडचे अधिकारी प्रवास करत असलेल्या ट्रेनलाच हायजॅक करण्यात आलं आहे.
6/8

बलूच आर्मीकडून ट्रेन हायजॅक केल्यानंतर एका वृत्तवाहिनीला ई-मेलद्वारे आपली भूमिका सांगितली आहे. या ट्रेनच्या लोको पायलटचा मृत्यू झाला असून ट्रेनमधून 500 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी, 182 जणांना ओलीस ठेवण्यात आलं आहे.
7/8

दरम्यान, पाकिस्तान हवाई दलाकडून ट्रेनमधील प्रवाशांची सुटका करण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून पाकिस्तानी हवाई दलाचे हॅलिकॉप्टर ट्रेनजवळील भागात पोहोचले आहेत.
8/8

पाकिस्तानी प्रवाशांच्या ट्रेनचं अपहरण केल्यानंतर बीएलए आर्मीने गंभीर इशारा देखील दिला आहे. पाकिस्तानी सैन्याने कुठलंही पाऊल उचलल्यास किंवा कारवाई केल्यास ट्रेनमधील सर्वच प्रवाशांना ठार करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
Published at : 11 Mar 2025 08:27 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement