अवकाळी पावसानं झोडपलं, सोलापुरात केळीच्या बागा आडव्या झाल्या, भाजीपाला, फळबाग शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, पंचनामा सुरु

प्रशासनाकडून सर्व तहसीलदारांना पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Continues below advertisement

solapur Agriculture loss

Continues below advertisement
1/6
सोलापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
Continues below advertisement
2/6
अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 240 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये केळी, आंबा आणि पालेभाज्यांचा प्रमुख समावेश आहे.
3/6
मोहोळ, पंढरपूर आणि सांगोला या तालुक्यांमध्ये नुकसानाची तीव्रता अधिक असून, अनेक शेतकऱ्यांचे उभे पीक वाऱ्यामुळे आडवे झाले आहे.
4/6
या परिस्थितीमुळे केवळ पीक नुकसानच नाही, तर फळबागा आणि भाजीपाल्याचे उत्पादनही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
5/6
दरम्यान, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांचं किती नुकसान झालंय हे पाहण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे.
6/6
पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले असून पंचनाम्याचा अहवाल येताच सरकारकडून घोषणा होईल असे शुक्राचार्य भोसले, जिल्हा कृषी अधिकारी सोलापूर यांनी सांगितले आहे.
Sponsored Links by Taboola
OSZAR »