Shirish Valsangkar Solapur: डॉ. शिरीष वळसंगकर रात्री 8 वाजता जेवले, 8.30 वाजता अचानक उठले अन्...; आयुष्य संपवण्याआधी घरात काय घडलं?

Shirish Valsangkar Solapur: सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी काल (18 एप्रिल) रात्री 8.30 वाजताच्या सुमारास आत्महत्या केली. शिरीष वळसंगकरांनी स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवलं.

Continues below advertisement

Shirish Valsangkar Solapur

Continues below advertisement
1/7
Shirish Valsangkar: सोलापुरातील पहिले मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर (वय 70, रा. मोदी) यांनी शुक्रवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास आपल्या निवासस्थानी स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली.
2/7
शिरीष वळसंगकर मृत्यूनंतर शहरात खळबळ उडाली. शिरीष वळसंगकरांनी आत्महत्या का केली, याबाबत आता पोलीस तपास सुरु आहे.
3/7
शिरीष वळसंगकर हे रात्री 8 वाजता घरात कुटुंबियांसमवेत जेवण करीत होते. 8.30 वाजता ते अचानक उठले व बाथरूममध्ये गेले. त्यांनी स्वतःच्या बंदुकीने डोक्यात गोळी घातली व ते जमिनीवर पडले.
4/7
शिरीष वळसंगकर यांचे चिरंजीव अश्विन हेही डॉक्टर असून त्यांनी प्राथमिक उपचार केले, पण साडेनऊच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
5/7
डॉ. शिरीष वळसंगकर हे अत्यंत प्रसिद्ध न्युरोफिजिशियन होते. त्यांनी केवळ सोलापूरच नव्हे तर महाराष्ट्रासह जगभरात आपली वैद्यकीय सेवा दिली.
Continues below advertisement
6/7
दुर्दैव म्हणजे ज्या रुग्णालयात वळसंगकर यांनी हजारो रुग्णांवर उपचार केले त्याच रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
7/7
शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केल्याची माहिती समजताच शहरातील मान्यवर तसेच त्यांचे रुग्ण आणि अनेक सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली. हॉस्पिटलमधील महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते.
Sponsored Links by Taboola
OSZAR »