Pune Cylinder Blast: पुण्यात सिलिंडरचा भीषण स्फोट, दोघांचा मृत्यू; अंगावर शहारे आणणारे PHOTO

Pune Blast news: पुण्यातील वारजे परिसरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात दोन व्यक्तींचा भाजून मृत्यू झाला आहे. या स्फोटामुळे पत्र्याची शेड उद्ध्वस्त झाली आहे.

Continues below advertisement

Pune gas Cylinder Blast

Continues below advertisement
1/10
पुण्यातील वारजे परिसरात मंगळवारी मध्यरात्री एका पत्र्याच्या घरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला.
2/10
या भीषण स्फोटात दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पुण्यातील वारजे माळवाडी परिसरातील घटना घडली आहे.
3/10
वारजे माळवाडी परिसरात असणाऱ्या गोकुळ नगर येथे पत्र्याचे बांधकाम असलेल्या घरांमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन लागली होती भीषण आग. मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
4/10
या स्फोटानंतर अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि ही आग विझवण्यात आली.
5/10
हा स्फोट इतका भीषण होता की, सिलेंडर केळीच्या सालासारख सोलून वेगळा झाला होता. सिलेंडरचे सर्व भाग वेगवेगळे झाले होते
Continues below advertisement
6/10
या स्फोटामुळे बाजूच्या पत्र्याच्या शेडमधील सगळे सामान विखुरले गेले. इतकी या स्फोटाची तीव्रता होती.
7/10
या स्फोटामुळे पत्र्याच्या शेडमधील सामानाची राखरांगोळी झाली होती.
8/10
या स्फोटात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, या दोन्ही व्यक्तींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
9/10
मोहन चव्हाण आणि आतिश चव्हाण असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. एकाचे वय २० ते २२ तर दुसऱ्याचे वय अंदाजे ५० ते ५५ आहे. याप्रकरणाचा अधिक तपास वारजे पोलिस करत आहेत.
10/10
या भीषण स्फोटामुळे सिलिंडरची रिंग आणि इतर सर्व भाग वेगवेगळे झाले होते.
Sponsored Links by Taboola
OSZAR »