एक्स्प्लोर
Pune Crime : पुणे पोलिसांकडून बनावट नोटा छापण्याचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त; 28 लाखांच्या कोऱ्याकरकरीत 500 अन् 200 च्या नोटा जप्त
Pune Crime : पुणे पोलिसांनी तब्बल 28 लाख रूपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. बनावट नोटा सापडल्यामुळे पुण्यात नेमकं काय चाललंय? असा सवाल उपस्थित होत आहे.

Pune Crime
1/10

पुण्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल २८ लाख ६६ हजार १०० रुपये किंमतीच्या बनावट नोटा पकडल्या आहेत.
2/10

याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये दोन महिलांचाही सहभाग आहे.
3/10

पोलिसांनी आरोपींकडून एक प्रिंटर मशीन तसेच 500 आणि 200 रुपयांच्या नोटांचे प्रिंटेड गठ्ठे हस्तगत करण्यात आले आहेत.
4/10

मनीषा ठाणेकर, भारतीय गवंड, सचिन यमगर,नरेश शेट्टी, प्रभू गुगलचड्डी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.
5/10

बँकेत बनावट नोटा जमा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
6/10

त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.
7/10

पोलिसांनी 28 लाख 66 हजार 100 रुपयांच्या प्रिंट केलेल्या बनावट नोटा आणि 2 लाख 4 हजार रुपयांच्या खऱ्या नोटा जप्त केल्या आहेत.
8/10

पोलिसांनी पाच आरोपींना बेड्या ठोकल्या असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
9/10

बनावट नोटा तयार करणांऱ्यामध्ये आणखी कुणाचा हात आहे का? याचा तपास करण्यात येत आहे.
10/10

बनावट नोटा सापडल्यामुळे पुण्यात नेमकं काय चाललंय? असा सवाल उपस्थित होत आहे.
Published at : 28 Apr 2025 06:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्राईम
मुंबई
आयपीएल
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
