शरद पवारांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा, जितेंद्र आव्हाडांची संकल्पना, ठाण्यातील तुळजाभवानी मंदिर कसं आहे?

Tulja Bhavani temple : शरद पवारांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा, जितेंद्र आव्हाडांची संकल्पना, ठाण्यातील तुळजाभवानी मंदिर कसं आहे?

Continues below advertisement

Tulja Bhavani temple

Continues below advertisement
1/15
Tulja Bhavani temple : माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून ठाण्यातील कोपरी पाचपाखडी येथे प्रति तुळजाभवानी मंदिर उभारण्यात आलंय.
2/15
ठाण्यातील तुळजाभवानी मंदिराच्या मूर्तीची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.
3/15
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख, ठाकरेंचे आमदार मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
4/15
जितेंद्र आव्हाड मंदिराची माहिती देताना म्हणाले, हे मंदिर 1500 टनाचं आहे.
5/15
मंदिराचे खांब कोठेही जोडण्यात आलेले नाहीत. एकाच दगडाचा एक खांब आहे.
Continues below advertisement
6/15
या मंदिराला 26 खांब आहेत. हे सर्व दगड आपण तामिळनाडूतील खाणीतून घेतले आहेत. खाणीतून घेतल्यानंतर हे कर्नाटक येथे आणण्यात आले. तिथे कोरीव काम करण्यात आलं.
7/15
4 वर्ष 50 मजूर येथे राहत होते. त्यांनी ही कलाकृती पूर्ण केली आहे. गेल्या चार वर्षांपासून या मंदिराचं काम सुरु होतं.
8/15
मंदिराच्या बांधकामात कोठेही स्टील किंवा सिमेंट वापरलेले नाही. पूर्णपणे दगडाने आणि हेमाडपंथी मंदिर आहे.
9/15
मंदिराचे जे कोरीव काम आहे, तेच तुम्हाला तुळजापूरलाही दिसेल. हे कर्नाटकमधील मजूरांनी केली आहे.
10/15
मंदिरात 36 गजमुख आहेत. मूर्ती 2004 साली आणली होती.
11/15
आंध्रप्रदेशातील कारागीराकडून ही मूर्ती साकारण्यात आली आहे.
12/15
यामध्ये काही चूका झाल्या असतील आई भवानी माफ करेन, असं आव्हाड म्हणाले.
13/15
हे मंदिर आता उभ्या महाराष्ट्रासाठी खुलं करण्यात आलं आहे.
14/15
दरम्यान, मूर्तीची प्रतिष्ठापणा करत असताना मंदिराला सजावट करण्यात आली होती.
15/15
शरद पवारांनी सपत्नीक मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.
Sponsored Links by Taboola
OSZAR »