Nagpur Flyover Accident: एकदिवसाआधी आमदाराकडून उड्डाण पुलाचे उद्घाटन; दुसऱ्याच दिवशी चालत्या कारवर पूलाचा भाग कोसळला, अन्...

Nagpur Flyover Accident: राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात एका उड्डाणपूलाचा काही भाग पूला खालून जाणाऱ्या चालत्या कारवर कोसळला असून यात कारचे मोठे नुकसान झाले आहे.

Continues below advertisement

Nagpur Flyover Accident

Continues below advertisement
1/6
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात सध्या मोठ्या प्रमाणात उड्डाणपूलासह रस्त्यांचे विकासकार्य सुरू आहे.
2/6
अशातच काल (20 फेब्रुवारी) एका उड्डाण पुलाचे उद्घाटन भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केले होतं.
3/6
या उद्घाटन सोहळ्याला काही तास उलटत नाही तोच त्या पुलाचा एक तुकडा खालून जाणाऱ्या एका कार वरती आदळला आहे.
4/6
नागपूरच्या प्रजापती नगर मधली एचबी टाऊन परिसरातील ही घटना असून सुदैवाने कारमध्ये असलेल्या कुटुंबाला कोणतीही इजा झाली नाही.
5/6
मात्र चालत्या कारवर उडानपुलावरून काँक्रीटचा विटाच्या आकाराचा तुकडा कोसळल्याने कारचं मोठं नुकसान झाले आहे.
Continues below advertisement
6/6
उडानपुलाच्या खालच्या भागाला क्रॅक होऊन काँक्रीटचा एका विटाच्या आकाराचा तुकडा खाली कोसळल्यामुळे परिसरात काही वेळ खळबळ उडाली आहे.
Sponsored Links by Taboola
OSZAR »