Shahaji bapu Patil: शहाजीबापूंनी वजनदार पॅटर्न बदलला! आठ दिवसात केलेल्या बदलाने रंगली चांगलीच चर्चा

Shahaji bapu Patil: वाघासारख्या डरकाळ्या फोडणाऱ्या बापूंचा आवाज त्यामुळे गेले आठ दिवस शांत झाला होते. आता पुन्हा एकदा बापू नव्या दमाने महाराष्ट्रासमोर येताना अधिक तंदुरुस्त होऊन समोर येत आहेत.

Continues below advertisement

Shahaji Bapu Patil

Continues below advertisement
1/10
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे फायरब्रॅन्ड नेते म्हणून ओळख असणारे शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) आता नवीन रूपात समोर येणार आहे.
2/10
बंगळूरू येथे हॅपिनेस कार्यक्रमातील पंचकर्म उपचार घेतल्यानंतर आता नऊ किलो वजन कमी करून पुन्हा नव्या जोमाने महाराष्ट्राच्या समोर येत आहेत.
3/10
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनासाठी गेलेले बापू पहिल्या दोन दिवसानंतर गायब झाले होते. अगदी त्यांच्या सांगोल्यात येऊन शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांचेवर टीकेची तोफ डागल्यावरही बापूंकडून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नव्हती.
4/10
आता याचे गुपित समोर आले असून 24 डिसेंबर रोजी शहाजीबापू त्यांचे मित्र महेश पाटील यांच्यासोबत बंगळूरू येथील श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात पंचकर्म आणि सुदर्शन क्रिया करण्यासाठी दाखल झाले होते.
5/10
वाघासारख्या डरकाळ्या फोडणाऱ्या बापूंचा आवाज त्यामुळे गेले आठ दिवस शांत झाला होते. आता पुन्हा एकदा बापू नव्या दमाने महाराष्ट्रासमोर येताना शाररिकदृष्ट्या अधिक तंदुरुस्त होऊन समोर येत आहेत.
Continues below advertisement
6/10
बंगळूरू येथील आश्रमात 24 डिसेंबरपासून बापूंचा हा आयुर्वेदिक कार्यक्रम सुरु झाला होता. पहाटे पाच वाजता उठून रोज दोन तास योगासने करायची , यानंतर उकडलेल्या पालेभाज्या , कडधान्ये याचा नाश्ता करून दुपारी बौद्धिक ऐकायचे आणि ध्यान धारण करायचे.
7/10
वाफेवर उकडलेल्या पालेभाज्या आणि चपातीचे पौष्टिक आणि शुद्ध शाकाहारी भोजन करायचे. दुपारी सुदर्शन प्रक्रिया आणि व्यायाम करायचा, संध्याकाळी मेडिटेशन अशा भरगच्चं दिनक्रमात बापू मग्न होते.
8/10
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शहाजीबापूंचा सायंकाळी हा कोर्स पूर्ण झाला. आज बापू बंगळूरू येथून पुन्हा सांगोल्याकडे परता जाण्यासाठी निघाले आहेत.
9/10
या आठ दिवसाच्या कार्यक्रमामुळे तब्बल नऊ किलो वजन कमी झाले आहे. आता खूपच हलके वाटत असल्याचे शहाजीबापू सांगतात.
10/10
रोज मटणाची हाडे मोडणारे बापू वाफेवर उकडलेले खाऊन वाघाची शेळी बनले की पुन्हा नव्या दमात त्याच जोमाने बापू राज्यभर सभा गाजवत फिरणार हे येणारा काळच दाखवून देणार आहे.
Sponsored Links by Taboola
OSZAR »