एकनाथ शिंदे पुन्हा रमले शेतात, प्रथमच केली आवाकाडोची लागवड
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा रमले शेतात रमल्याचे पाहायला मिळाले.
Continues below advertisement
Deputy Chief Minister Eknath Shinde planted avocados
Continues below advertisement
1/10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा शेतीत रमल्याचे पाहायला मिळालं.
2/10
सातारा जिल्ह्यातील दरे गावातल्या शेतात यंदा केली आवाकाडोची लागवड केली.
3/10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. दरवर्षी आपल्या गावी गेल्यावर ते आपल्या सहकाऱ्यांसोबत एका तरी नव्या झाडाची लागवड करतात. यापूर्वी स्ट्रॉबेरी, हळद, चिक्कू आणि बांबूची लागवड केल्यानंतर यंदा पहिल्यांदाच आवाकाडो या परदेशी फळाची लागवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
4/10
आज केलेल्या पहिल्या प्रयत्नात त्यांनी स्वतः हातात फावडे आणि झारी घेत आवाकाडोचे झाड लावले.
5/10
आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असलेल्या आवाकाडो फळाची लागवड करून हा प्रयोग यशस्वी झाल्यास स्थानिक शेतकऱ्यांनाही पर्यायी जोड पीक म्हणून आवाकाडोची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे यासाठी त्यांनी स्वतःच्या शेतात हा प्रयोग केला.
Continues below advertisement
6/10
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कोयना नदीच्या पट्ट्यातील दरे गावचा परिसरातील माती ही अत्यंत सुपीक असून त्यात कोणतेही पीक घेतले तरी ते उत्तमरीत्या येते असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
7/10
आवाकाडो लागवडीचा हा प्रयत्न नक्की यशस्वी होईल याची एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
8/10
स्ट्रॉबेरी, ब्लु-बेरी अशा बेरीवर्गीय वनस्पतींची लागवड करणाऱ्या या पट्यात शेतकऱ्यांना आवाकाडो लागवडीतून नवीन नगदी उत्पन्न देणारे आणखी एक पीक सापडेल असा त्याना विश्वास आहे. त्यामुळेच हा प्रयोग यशस्वी करण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या शेतात केला आहे.
9/10
यावेळी त्यांच्यासोबत दरे गावातील ग्रामस्थ आणि शिंदे यांचे सर्व सहकारी आवर्जून उपस्थित होते.
10/10
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कोयना नदीच्या पट्ट्यातील दरे गावचा परिसरातील माती ही अत्यंत सुपीक असून त्यात कोणतेही पीक घेतले तरी ते उत्तमरीत्या येते असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
Published at : 20 Apr 2025 11:58 PM (IST)