'मदर्स डे' असाही... मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते; जंगलातील वाघिणीची बछड्यांसोबत आभाळमाया

जगभरात आज मातृत्व दिवस साजरा केला जात आहे. आपल्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त करत आईचं आपल्या लेकरांप्रती असलेलं प्रेम आणि त्यांच्यासाठी घेतले जाणारे कष्ट अधोरेखीत केले जात आहेत.

Continues below advertisement

Bhandara forest tiger love

Continues below advertisement
1/7
जगभरात आज मातृत्व दिवस साजरा केला जात आहे. आपल्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त करत आईचं आपल्या लेकरांप्रती असलेलं प्रेम आणि त्यांच्यासाठी घेतले जाणारे कष्ट अधोरेखीत केले जात आहेत.
Continues below advertisement
2/7
सोशल मीडियावरही आज आईसमवेतच्या फोटोचे स्टेटस ठेऊन आणि आईवरील गाणे, स्टेटस, कोट्सची स्टोरी ठेऊन आपलं मातृप्रेम साजरा केलं जात आहे. कुठे केक कापूनही मदर्स डेचे सेलीब्रेशन सुरू आहे.
3/7
माणसाप्रमाणेच प्राणी, पशू पक्षांमध्येही आई-लेकराचं प्रेम असतं, अनेकदा ते निसर्गाच्या सानिध्यातून दिसून येतं. असंच एका, वाघीणीचं तिच्या बछड्यांसोबतचं मातृत्व प्रेम कॅमेरात कैद झालं आहे. उमरेड-पवणी-कऱ्हांडला अभयारण्यातील हे विलोभनीय दृश्य आहे.
4/7
जंगल सफारी करताना आज पर्यटक आणि वन्यजीव प्रेमींना एक आगळंवेगळं मातृत्वाचं वात्सल्य बघायला मिळालं. उमरेड - पवणी - कऱ्हांडला अभयारण्यात सध्या पर्यटकांचं F2 वाघीण आणि तिच्या बछड्यांसह अन्य वाघिणींच्या कुटुंबाचं दर्शन होत असल्यानं पर्यटकांची मोठी गर्दी वाढलीय.
5/7
गोठणगावं इथं F2 वाघीण आणि तिच्या बछड्यांमधील हे मातृत्वाचं वात्सल्य कॅमेरात कैद झालय. F2 वाघिण तिच्या तीन बछड्यांसह लीलया प्रेम आणि मस्ती करतानाचा प्रसंग जंगल सफारीवर गेलेले वन्यप्रेमी सिद्धेश मुणगेकर यांनी त्यांच्या कॅमेरात कैद केली.
6/7
गोठणगाव परिसरातील एक रमणीयस्थळी पानवठ्यालगत F2 वाघीण बसलेली असताना तिचे बछडे तिच्या अंगाखांद्यावर खेळत होते. एका बछड्याला ती दूध पाजत होती तर, अन्य दोन बछडे तिच्याशी मस्ती करीत असल्याचे दिसून येतंय.
7/7
तेवढ्याचं मातृत्वाच्या प्रेमानं F2 वाघिणीनंही तिच्या तिन्ही बछड्यांना प्रेमानं गोंजरून जिभेनं चाटून त्यांचा लाड पुरविला. हे सर्व वन्यजीव प्रेमी सिद्धेश मुणगेकर यांनी त्यांच्या कॅमेरात अलगद टिपलं.
Sponsored Links by Taboola
OSZAR »