पावसामुळे नुकसान, वडिलांसोबत भिजलेला कांदा उचलणाऱ्या चिमुकलीला मदत; हटके स्टाईलने आनंद व्यक्त

राज्यभरात 25 मे रोजी मुसळधार पाऊस पडला. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळाल. या पावसाने शेतकरी वर्गाचं मोठं नुकसानही झालं.

Continues below advertisement

beed rain onion farmer doughter

Continues below advertisement
1/8
राज्यभरात 25 मे रोजी मुसळधार पाऊस पडला. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळाल. या पावसाने शेतकरी वर्गाचं मोठं नुकसानही झालं.
2/8
शेतकऱ्यांच्या नुकसानाबाबत एबीपी माझा ने प्रसारित केलेल्या बातमीची दखल घेऊन बीडच्या आष्टी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी दरेकर कुटुंबासाठी अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत.
3/8
शिवसेना युबीटीचे आमदार मिलिंद नार्वेकरांच्या मदतीनंतर जिल्हा परिषदेचे शिक्षक बाळासाहेब पवार यांनी दरेकर कुटुंबातील चिमुकलीसाठी शालेय साहित्याची मदत केलीय. या मदतीदरम्यान मिळालेल्या वहीच्या पहिल्या पानावर प्रगती दरेकर या चिमुकलीने एबीपी माझाचे आभार मानले आहेत...
4/8
आष्टी तालुक्यातील शिंदेवाडी येथील महेश दरेकर यांच्या 300 गोण्या कांद्याचा चिखल मान्सूनपूर्व पावसाने झाला होता. उरलेला कांदा जोपासण्यासाठी चिमुकली प्रगती दरेकर देखील मदत करत होती.
5/8
या 300 गोणी कांदाच्या उत्पन्नातून दरेकर कुटुंबाचं आर्थिक वर्ष ठरणार होते. यात मुलीचे शिक्षण देखील करायचे होते. पण, या पावसाच्या पाण्यासोबत वर्षभराची स्वप्नही वाहून गेली होती.
Continues below advertisement
6/8
सोशल मीडियातून दरेकर कुटुंबींच्या स्वप्नाचे वास्तव समोर आले, एबीपी माझाने यासंदर्भात बातमी दाखवल्यानंतर चिमुकलीच्या मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले.
7/8
यासंदर्भात बातम्या प्रसारित झाल्यानंतर अनेक मदतीचे हात दरेकर कुटुंबासाठी पुढे येत आहेत. आज बाळासाहेब पवार या जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने शालेय साहित्यासह शिक्षणाचा खर्च उचलला आहे.
8/8
दरम्यान, प्रगतीच्या भेटीला आलेल्या शिक्षक महोदयांनी व त्यांच्या पत्नीने प्रगतीच्या आई-वडिलांसोबतही संवाद साधला. यावेळी, सर्वजणच भावूक झाले होते
Sponsored Links by Taboola
OSZAR »