एक्स्प्लोर
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्या पत्नीचा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघात झाल्याची माहिती आहे. त्यामध्ये सोनू सूदची पत्नी जखमी झाली आहे. मात्र, सुदैवने सोनू सूदची पत्नी सुखरुप आहे.

Sonali sood accident in nagpur samruddhi highway
1/7

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्या पत्नीचा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघात झाल्याची माहिती आहे. त्यामध्ये सोनू सूदची पत्नी जखमी झाली आहे. मात्र, सुदैवने सोनू सूदची पत्नी सुखरुप असून चिंता करण्यासारखी बाब नसल्याचं सांगितलं जात आहे.
2/7

सोनू सूद यांची पत्नी सोनाली सूद त्यांच्या दोन नातेवाईकांसह कारने नागपूरच्या दिशेने येत असताना सोनेगाव पोलीस स्टेशन समोरील उड्डाणपुलावर कार एका ट्रकसोबत धडकली.
3/7

अधिकृत माहितीनुसार, सोनू सूदची पत्नी सोनाली हिचा अपघात झालाय, मात्र चिंता करण्यासारखं काही नसल्याची माहिती आहे. सध्या तिच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
4/7

सोनू सूदने देखील त्याच्या पत्नीच्या अपघाताबाबत अधिकृतपणे भाष्य केलेलं नाही. मात्र, तो तत्काळ मुंबईहून नागपूरकडे बायकोला भेटण्यासाठी रवाना झाल्याची माहिती आहे.
5/7

अपघातामधील कारमध्ये सोनूची पत्नी सोनाली सूदसह तिच्या बहिणीचा मुलगा आणि एक महिला प्रवास करत होती. सुदैवाने सर्वजण सुखरुप आहेत.
6/7

सोनाली सूद वाहन चालकाच्या बाजूच्या सीटवर समोर बसल्या होत्या.. मात्र अपघातानंतर एअर बॅग उघडले गेले आणि त्यामुळे सोनाली सूद आणि त्यांचे दोन्ही नातेवाईक जास्त जखमी झाले नाही.
7/7

सोनू सूदने पत्नीची भेट घेतली असून ओम साई राम.. असे म्हटले. पत्नी ठीक असून अपघातामध्ये तिला कुठलीही जखमी झाली नाही हे चमत्कारीक असल्याचं त्याने म्हटलं आहे
Published at : 25 Mar 2025 04:10 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
