परी म्हणू की सुंदरा... मरमेड स्टाईल गाऊनमध्ये कान्सच्या रेड कार्पेटवर झळकली अनुष्का सेन
कान्स फिल्म फेस्टिवल आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर भारताचे प्रतिनिधित्व करताना अनुष्काने आपल्या स्टाइल आणि ग्रेसने एक खास छाप सोडली आहे.
Continues below advertisement
Anushka Sen and Cannes Film Festival
Continues below advertisement
1/10
भारतीय यंग अभिनेत्री अनुष्का सेन ने 22व्या वर्षी 78व्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये आपला स्टायलिश आणि रॉयल लूकच्या माध्यमातून डेब्यू केला. वाईन कलर मरमेड स्टाईल गाऊन मध्ये सर्वांच्या नजरा अनुष्का ने घेरल्या.
2/10
अनुष्का ने रेड कार्पेट वर आपल्या मोहक अंदाजाने सर्वाने लक्ष वेधून घेतले, यावेळी संपूर्ण सोशल मिडीयावर खुप व्हायरल होत आहे, आणि हा आऊटफिट स्ट्रैपलेस मरमेड स्टाईलने डिझाइन केला होता. या आऊटफिटचा कलर रॉयल पर्पल होता.
3/10
या गाऊनच्या मागच्या बाजूला एक मोठा ट्रेल होता, आणि हेच या आऊटफिटला खुप खास बनवत होते, या गाऊनची डिझाइन ट्री ऑफ लाइफ या पासून प्रेरित होता, ज्यामध्ये झरदोझी, आरी, सिल्क आणि क्रिस्टल धाग्यांचा वापर करण्यात आला.
4/10
गाऊनच्या वर असलेले फ्लोरल बेल आणि मागे फ्रिग असल्यामुळे आऊटफिट खुप आकर्षित दिसत होता. गाऊनला तयार करण्यासाठी एकूण 611 घंटे आणि 34 फॅशन डिझाइनरने मेहनत घेतली होती.
5/10
या गाऊन भारतीय फॅशन आणि वेस्टर्न फॅशन दर्शवते, अनुष्का ने आपल्या लुकला सिंपल आणि आकर्षक दिसण्यासाठी विक्टोरियन स्टाइलचे लांब कानातले आणि एमराल्ड ग्रीन स्टेटमेंट रिंग घातली होती.
Continues below advertisement
6/10
तिचा मेकअप अगदी नैसर्गिक आणि सॉफ्ट होता, ज्यात हलका बेस, काजल आणि गुलाबी रंगाची लिपस्टिक होती, ज्यामुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत होते.
7/10
केसांसाठी तिने सॉफ्ट कर्ल्स करून उंच बन बांधला होता, जो तिच्या रॉयल लूकला आणखीनच ग्रेसफुल बनवत होता.
8/10
तिच्या या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि तिच्या चाहत्यांनी तिचे खूप कौतुक केले.
9/10
अनुष्काने आपल्या पहिल्याच कान्स लूकमध्ये आत्मविश्वास आणि मोहकता दाखवून सर्वांना प्रभावित केले.
10/10
तिचा हा रॉयल आणि पारंपरिक पण आधुनिक टच असलेला लूक फॅशन जगतात नक्कीच चर्चेचा विषय बनला आहे.
Published at : 19 May 2025 02:23 PM (IST)