Reliance Industries: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 16 टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, स्टॉक 1600 रुपयांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Reliance Share Price : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 25 जून रोजी जोरदार तेजी पाहायला मिळाली. ब्रोकरेज फर्म या स्टॉकवर बुलिश असल्याचं पाहायला मिळतं.
Continues below advertisement
रिलायन्स इंडस्ट्रीज
Continues below advertisement
1/6
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीच्या स्टॉकमध्ये आज जोरदार तेजी पाहायला मिळाली आहे. आज रिलायन्सचा स्टॉक 1472 रुपयांपर्यंत पोहोचला होता.
2/6
सध्या रिलायन्सचा स्टॉक 1468 रुपयांवर ट्रेड करत आहे. आज स्टॉकमध्ये एक टक्के तेजी पाहायला मिळाली आहे. ब्रोकरेज फर्म सिटी आणि सीएलएसएनं या स्टॉकमध्ये 16 टक्के तेजी येईल असा अंदाज वर्तवला आहे.
3/6
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरला ब्रोकरेज फर्म सिटीनं बाय रेटिंग दिलं आहे. म्हणजे गुंतवणूकदार हा स्टॉक खरेदी करु शकतात. त्यांनी स्टॉकचं टारगेट 1585 रुपयांनी वाढवून 1690 रुपये केलं आहे. सीएलएसएनं रिलायन्स स्टॉकला आउटरपरफॉर्म रेटिंग दिलं आहे. या फर्मनं स्टॉकचं टारगेट प्राइस 1650 रुपये ठेवलं आहे.
4/6
ब्रोकरेज फर्मनं जिओ प्लॅटफॉर्मसाठी एबिटा शिवाय वाढीचा अंदाज 16 टक्के सीएजीआरनं वर्तवला आहे. या व्यवसायाचं मूल्य 135 बिलियन डॉलर्स झालं आहे.
5/6
ब्रोकरेज फर्म सीएलएसएनं रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण बैठक ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये होईल असा अंदाज वर्तवला आहे. रिलायन्स जिओच्या आयपीओची घोषणा त्या बैठकीत केली जाण्याची शक्यता आहे. रिलायन्स क्विक कॉमर्स, एफएमसीजी आणि न्यू एनर्जीच्या विस्ताराची घोषणा केली होती.
Continues below advertisement
6/6
image 6
Published at : 25 Jun 2025 04:15 PM (IST)