Gold price: सोन्यामध्ये आत्ताच पैसे गुंतवा, सर्वात मोठी उसळी येणार, डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याचा भाव किती होणार?
Gold Price: सोन्याच्या भावात सर्वात मोठी उसळी येणार, एक तोळा सोनं डायरेक्ट 1.30 लाखांवर पोहोचणार. गोल्डमन सॅक्सने यासंदर्भातील भाकीत वर्तविले आहे. त्यामुळे सोने खरेदी आवाक्यापलीकडे जाऊ शकते
Continues below advertisement
Gold price
Continues below advertisement
1/9
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे सध्या जगभरातील भांडवली बाजारांमध्ये प्रचंड चढउतार पाहायला मिळत आहेत. या अस्थिर वातावरणामुळे गुंतवणुकदारांचा कल सोने खरेदीकडे वाढताना दिसत आहे.
2/9
अस्थिर वातावरणात सोन्याचा पारंपरिक गुंतवणुकीचा पर्याय सर्वात सेफ ऑप्शन मानला जात आहे. त्यामुळे परवापर्यंत सोन्याचे भाव कोसळतील अशी चर्चा सुरु असताना आता सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे.
3/9
गोल्डमन सॅक्सने सोन्याच्या दराबाबत महत्त्वपूर्ण भाकीत वर्तविले आहे. गोल्डमन सॅक्सने म्हटले आहे की परिस्थिती खूप वाईट झाली तर 2025 च्या अखेरीस सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1.30 लाख रुपयांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे.
4/9
दीची भीती आणि अमेरिका-चीन यांच्यातील वाढत्या व्यापारयुद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस 4,500 डॉलरपर्यंत पोहोचू शकते. आंतरराष्ट्रीय दरानुसार भारतात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1.30 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते, असे गोल्डमन सॅक्सचे भाकीत आहे.
5/9
व्यापार युद्ध आणि मंदीचा धोका टोकाच्या पातळीवर पोहोचला नाही, तरी सोने प्रति औंस 3,700 डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सोन्याची किंमत आगामी काळात फार कमी होणार नाही, असे संकेत गोल्डमन सॅक्सच्या भाकितावरुन मिळत आहेत.
Continues below advertisement
6/9
आंतरराष्ट्रीय पातळीवर अस्थिर परिस्थिती निर्माण झाल्याने विविध देशांच्या केंद्रीय बँकांकडून बँक ऑफ इंग्लंडकडे मोठ्याप्रमाणावर सोने मागायला सुरुवात केली आहे. केंद्रीय बँकांकडून दरमहा सरासरी 80 टन सोन्याची मागणी अपेक्षित आहे. ही मागणी यापूर्वीच्या 70 टनांच्या अंदाजापेक्षाही अधिक आहे, असे गोल्डमन सॅक्सचे म्हणणे आहे.
7/9
'गोल्ड ईटीएफ'मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असल्याचेही 'गोल्डमन'ने नमूद केले आहे. येत्या 12 महिन्यांत अमेरिकेत मंदी येण्याची शक्यता 45% असल्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
8/9
सध्याच्या घडीला सोन्याचा भाव प्रतितोळा 96,380 रुपये इतका आहे. तर चांदीचा प्रतितोळा दर 99,800 रुपये इतका आहे.
9/9
आगामी काळात सोन्याचा भाव प्रतितोळा सव्वा लाखांच्या पुढे गेल्यास सामान्य लोकांना सोने खरेदी करणे अशक्यप्राय होईल.
Published at : 15 Apr 2025 12:28 PM (IST)