एक्स्प्लोर

Jaykumar Gore vs Ramraje Naik Nimbalkar : मोठी बातमी: रामराजेंच्या चौकशीसाठी पोलीस घरी पोहोचले, मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामीचा वाद, साताऱ्यात वेगवान घडामोडी

Jaykumar Gore vs Ramraje Naik Nimbalkar : जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी चौकशी प्रकरणात वडूज पोलीस रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी दाखल  झाले आहेत.

Jaykumar Gore vs Ramraje Naik Nimbalkar : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या बदनामी आणि खंडणी चौकशी प्रकरणात वडूज पोलीस (Vaduj Police) माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी दाखल  झाले आहेत. जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेसोबत रामराजे यांचे मोबाईलवर संभाषण झाल्याचे काही दिवसांपूर्वी उघड झाले होते. काही दिवसांपूर्वी वडूज पोलिसांनी रामराजे यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर होण्याचे समन्स बजावले होते. संबंधित महिलेला 1 कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना सातारा पोलिसांनी अटक केली होती. मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी प्रकरणात याआधी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर आता माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू केली आहे, वडूज पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी रामराजे यांच्यासह 11 जणांना समन्स बजावले आहे. या घटनेने साताऱ्यात खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

कराड तालुक्यातील एका महिलेला नग्न फोटो पाठवल्याच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले राज्याचे ग्रामविकासमंत्री व भाजप नेते जयकुमार गोरे यांच्यावरती मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती. या प्रकरणातील संबंधित महिलेने जयकुमार गोरे यांच्यावरती गंभीर आरोप केले होते. मला गेल्या सहा वर्षांमध्ये अनेकदा मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी त्रास दिला होता. ज्यावेळी मला पत्र आलं त्यावेळी मी त्रास होत असल्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर थांबून याबाबतची माहिती सांगितली. त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस अधीक्षकांना घटनेबाबत सांगितली. मात्र, त्यावेळी पोलीस अधीक्षकांनी कोणतीही दखल घेतली नाही. माझी बदनामी होत असल्याचं त्या महिलेने म्हटलं होतं, यावरून मंत्री गोरेंना विरोधकांनी धारेवर धरलं होतं, त्यानंतर या प्रकरणात कारवाई करत संबंधितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

या प्रकरणी 'लय भारी' या यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांना अटक करण्यात आली होती. भाजपचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तुषार खरात यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. तुषार खरात यांच्यावर अॅट्रॉसिटी, विनयभंग, खंडणी इत्यादी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वडूज, दहवडी, म्हसवड, तलभीड, सोलापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्याविरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात एकतर्फी बातम्या दाखवून बदनामी केल्याचा आरोप तुषार खरात यांच्यावर करण्यात आला आहे.

गोरे यांनी यावर अधिवेशन चालू असताना स्पष्टीकरण दिलं होतं, "2017 साली माझ्याविरोधात एक गुन्हा दाखल झाला होता. 2019 साली या प्रकरणी निकाल लागला. निकालाची प्रत माझ्याकडे आहे. निकालामध्ये कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलं आहे." याप्रकरणी आता चौकशीसाठी रामराजे नाईक निंबाळकर यांना देखील समन्स पाठवण्यात आलं आहे.

आणखी वाचा

फलटणचा शकुनी मामा कधीच जिंकणार नाही, जयकुमार गोरेंचा रामराजे निंबाळकरांना टोला, म्हणाले मला संपवता संपवता तेच घरी बसले

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vaishnavi Hagawane : 10 लाखांचं रिसॉर्ट, 22 लाखांचा स्टेज! वैष्णवीच्या लग्नाचा खर्च दीड कोटी...
Vaishnavi Hagawane : 10 लाखांचं रिसॉर्ट, 22 लाखांचा स्टेज! वैष्णवीच्या लग्नाचा खर्च दीड कोटी...
Nashik Crime news: आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने सासू-नणंदेकडून महिलेला जातीवाचक शिवीगाळ, घरातच गोळ्या देऊन गर्भपात केला, नाशिकमधील धक्कादायक घटना
आंतरजातीय लग्नाला विरोध, नर्स असलेल्या सासूने घरातच सुनेचा गर्भपात केला, नाशिक हादरलं
Dam Water Storage: 45 वर्षांत पहिल्यांदाच मेमध्ये उजनी प्लसमध्ये, खडकवासलासह जायकवाडीत किती पाणीसाठा?  जाणून घ्या
45 वर्षांत पहिल्यांदाच मेमध्ये उजनी प्लसमध्ये, खडकवासलासह जायकवाडीत किती पाणीसाठा? जाणून घ्या
छगन भुजबळांना मंत्रिपद, मुंडे नाराज? मुंबईत अजित पवारांची अमित शाहांसोबत बैठक, 20 मिनिटे चर्चा
छगन भुजबळांना मंत्रिपद, मुंडे नाराज? मुंबईत अजित पवारांची अमित शाहांसोबत बैठक, 20 मिनिटे चर्चा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vaishnavi Hagawane : 10 लाखांचं रिसॉर्ट, 22 लाखांचा स्टेज! वैष्णवीच्या लग्नाचा खर्च दीड कोटी...Pune Maratha Wedding: पुण्यात मराठा समाजातील लग्नासाठीची आचारसंहिता? ना राजकारणी ना बडेजावपणाAIMIM MP Asaduddin Owaisi : पाकिस्तानी पंतप्रधान स्टुपिड-जोकर, ओवेसींनी कुवैतमध्ये जाऊन अब्रू काढलीSiddhant Shirsat Controversy : विवाहितेशी संबंध,लग्न आणि धोका!शिरसाटांच्या लेकावर गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaishnavi Hagawane : 10 लाखांचं रिसॉर्ट, 22 लाखांचा स्टेज! वैष्णवीच्या लग्नाचा खर्च दीड कोटी...
Vaishnavi Hagawane : 10 लाखांचं रिसॉर्ट, 22 लाखांचा स्टेज! वैष्णवीच्या लग्नाचा खर्च दीड कोटी...
Nashik Crime news: आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने सासू-नणंदेकडून महिलेला जातीवाचक शिवीगाळ, घरातच गोळ्या देऊन गर्भपात केला, नाशिकमधील धक्कादायक घटना
आंतरजातीय लग्नाला विरोध, नर्स असलेल्या सासूने घरातच सुनेचा गर्भपात केला, नाशिक हादरलं
Dam Water Storage: 45 वर्षांत पहिल्यांदाच मेमध्ये उजनी प्लसमध्ये, खडकवासलासह जायकवाडीत किती पाणीसाठा?  जाणून घ्या
45 वर्षांत पहिल्यांदाच मेमध्ये उजनी प्लसमध्ये, खडकवासलासह जायकवाडीत किती पाणीसाठा? जाणून घ्या
छगन भुजबळांना मंत्रिपद, मुंडे नाराज? मुंबईत अजित पवारांची अमित शाहांसोबत बैठक, 20 मिनिटे चर्चा
छगन भुजबळांना मंत्रिपद, मुंडे नाराज? मुंबईत अजित पवारांची अमित शाहांसोबत बैठक, 20 मिनिटे चर्चा
मंत्र्याच्या मुलाने 3 लग्नं केली, आम्ही असं केलं असतं तर अख्खा मिडिया घरासमोर जमला असता; सिद्धांत शिरसाट प्रकरणावर इम्तियाज जलील यांचं वक्तव्य
मंत्र्याच्या मुलाने 3 लग्नं केली, आम्ही असं केलं असतं तर अख्खा मिडिया घरासमोर जमला असता; सिद्धांत शिरसाट प्रकरणावर इम्तियाज जलील यांचं वक्तव्य
Amit Shah : मोदींनी भारताला दहाव्या स्थानावरुन 4 नंबरला आणलं, एक चुटकी सिंदूरचं महत्त्व जगाला दाखवलं, अमित शाहांचं घणाघाती भाषण
मोदींनी भारताला दहाव्या स्थानावरुन 4 नंबरला आणलं, एक चुटकी सिंदूरचं महत्त्व जगाला दाखवलं, अमित शाहांचं घणाघाती भाषण
Pune Crime: गुहागरमधून लोणावळ्यात देवदर्शनासाठी गेला,  रात्री गाडी वळवण्याच्या वादातून कमलेशला स्थानिक तरुणांनी संपवलं
धक्कादायक! गुहागरमधून लोणावळ्यात देवदर्शनासाठी गेला, रात्री गाडी वळवण्याच्या वादातून कमलेशला स्थानिक तरुणांनी संपवलं
Siddhant Shirsat : संजय शिरसाटांच्या मुलावर विवाहितेकडून शारीरिक छळाचा आरोप; दानवे, इम्तियाज जलील संतापले, चाकणकरांच्या महिला आयोगाला धारेवर धरलं; म्हणाले...
संजय शिरसाटांच्या मुलावर विवाहितेकडून शारीरिक छळाचा आरोप; दानवे, इम्तियाज जलील संतापले, चाकणकरांच्या महिला आयोगाला धारेवर धरलं; म्हणाले...
Embed widget
OSZAR »