एक्स्प्लोर

'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ विशेष रेल्वेचा पहिला मुक्काम रायगडावर; कसा असेल रूट, किती दिवसांची यात्रा?

नुकतेच 6 जून रोजी किल्ले रायगडावर मोठा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त येथे अभिवादन करण्यासाठी जमले होते.

मुंबई : भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी) (IRCTC) ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या एका विशेष रेल्वेची घोषणा केली होती. आता, उद्या म्हणजे 9 जूनपासून ही रेल्वे प्रवाशांच्या सेवेत सुरू होते आहे. ‘भारत गौरव टुरिस्ट ट्रेन’ अंतर्गत उद्यापासून ही यात्रा  सुरू होत असून विशेष म्हणजे ही रेल्वे पहिल्याच दिवशी रायगड किल्ल्याला येथे भेट देणार आहे. या रेल्वेचा एकूण 5 दिवसांचा महाराष्ट्रभर प्रवास असणार आहे. सकाळी साडे दहा वाजता ही रेल्वे सीएसएमटी मुंबई वरून माणगाव रेल्वे स्थानकात पोहचणार आहे. त्यानंतर, प्रवाशांना येथील रायगड (Raigad) किल्ल्यावर जाऊन किल्ले (Fort) रायगड पाहता येईल. 

नुकतेच 6 जून रोजी किल्ले रायगडावर मोठा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त येथे अभिवादन करण्यासाठी जमले होते. विशेष म्हणजे किल्ले रायगडवर पर्यटनासाठी व शिवरायांचा जाज्वल्य इतिहास जाणून घेण्यासाठीही दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. आता, रेल्वे विभागाने शिवाजी महाराजांच्या नावानेच एक विशेष पर्यटन ट्रेन सुरू केली आहे. रायगड, प्रतापगड, लाल महाल, कोल्हापूर, पन्हाळा अशा ऐतिहासिक ठिकाणांना ही ट्रेन भेट देणार असून उद्यापासूनच या रेल्वे गाडीचा शुभारंभ होत आहे. विशेष म्हणजे, प्रवाशांची अगोदरच यासाठी बुकींगही केलं आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट रेल्वेचा प्रवास पुढीलप्रमाणे असणार

 शुभारंभ दिनांक: 9 जून 2025

कालावधी: 5 दिवस /5 दिवसांची यात्रा (सकाळी समाप्ती)

प्रारंभ व समाप्ती स्थान: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई

प्रवास सुरु व संपण्याचे स्थानक : दादर, ठाणे

यात्रेचा प्रवासमार्ग  पुढीलप्रमाणे 

मुंबई (सीएसएमटी)-रायगड-पुणे-शिवनेरी-भीमाशंकर-प्रतापगड-कोल्हापूर-पन्हाळा- मुंबई. म्हणजे, मुंबई, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या 4 जिल्ह्यातून ही ट्रेन ऐतिहासिक पर्यटन घडवणार आहे. 

🏰 प्रमुख स्थळांना भेट, कुठे होणार पर्यटन 

रायगड किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक येथे झाला व ही राजधानी होती.

लाल महाल, पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण येथे गेले.

कसबा गणपती व शिवसृष्टी,पुणे –पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय.

शिवनेरी किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ.

भीमाशंकर ज्योतिर्लिंग – १२ ज्योतिर्लिंग पैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ.

प्रतापगड किल्ला – अफझल खानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाण.

कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर

पन्हाळा किल्ला – बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक.

हेही वाचा

निवडणुकीनंतर किरण कुलकर्णींची बदली का केली, त्यांची नार्को टेस्ट करा; फडणवीसांच्या लेखावर काँग्रेसची मागणी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मंत्री राणेंनी डॉक्टरला ऑन द स्पॉट सस्पेंड केलं; आता निर्णय मागे घेण्याची वेळ; नेमकं काय घडलं?
मंत्री राणेंनी डॉक्टरला ऑन द स्पॉट सस्पेंड केलं; आता निर्णय मागे घेण्याची वेळ; नेमकं काय घडलं?
Parle g biscuit चा पुडा चक्क 2300 रुपयांना, इस्रायलने मानवतावादी मदत रोखल्याने गाझामध्ये भीषण अन्नटंचाई
Parle g biscuit चा पुडा चक्क 2300 रुपयांना, इस्रायलने मानवतावादी मदत रोखल्याने गाझामध्ये भीषण अन्नटंचाई
Omraje Nimbalkar on Nitesh Rane : नितेश राणेंना धाराशिवमध्ये घर बांधून द्या, येण्या-जाण्याचा त्रास नको; ठाकरेंचे खासदार ओमराजेंचा पलटवार 
नितेश राणेंना धाराशिवमध्ये घर बांधून द्या, येण्या-जाण्याचा त्रास नको; ठाकरेंचे खासदार ओमराजेंचा पलटवार 
काजव्यांचं विलक्षण दृश्य यंदा फिकं पडलं, भंडारदऱ्यात मान्सूनच्या लवकर आगमनामुळे पर्यटकांची निराशा
काजव्यांचं विलक्षण दृश्य यंदा फिकं पडलं, भंडारदऱ्यात मान्सूनच्या लवकर आगमनामुळे पर्यटकांची निराशा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nilesh Rane : भीतीपोटी ते एकत्र येणार असतील तर..., निलेश राणे यांची खोचक प्रतिक्रियाOmraje Nimbalkar on Nitesh Rane : विकासनिधी म्हणजे कणकवलीची वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाहीAnandache Paan : गाथा स्वराज्याची..पैलू शिवचरित्राचे..लेखक सदानंद कदम यांच्याशी खास संवादKishori Pednekar : मराठी माणूस परप्रांतीयांच्या दबावाखाली; ठाकरे बंधूंनी एकत्र येणं काळाची गरज

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मंत्री राणेंनी डॉक्टरला ऑन द स्पॉट सस्पेंड केलं; आता निर्णय मागे घेण्याची वेळ; नेमकं काय घडलं?
मंत्री राणेंनी डॉक्टरला ऑन द स्पॉट सस्पेंड केलं; आता निर्णय मागे घेण्याची वेळ; नेमकं काय घडलं?
Parle g biscuit चा पुडा चक्क 2300 रुपयांना, इस्रायलने मानवतावादी मदत रोखल्याने गाझामध्ये भीषण अन्नटंचाई
Parle g biscuit चा पुडा चक्क 2300 रुपयांना, इस्रायलने मानवतावादी मदत रोखल्याने गाझामध्ये भीषण अन्नटंचाई
Omraje Nimbalkar on Nitesh Rane : नितेश राणेंना धाराशिवमध्ये घर बांधून द्या, येण्या-जाण्याचा त्रास नको; ठाकरेंचे खासदार ओमराजेंचा पलटवार 
नितेश राणेंना धाराशिवमध्ये घर बांधून द्या, येण्या-जाण्याचा त्रास नको; ठाकरेंचे खासदार ओमराजेंचा पलटवार 
काजव्यांचं विलक्षण दृश्य यंदा फिकं पडलं, भंडारदऱ्यात मान्सूनच्या लवकर आगमनामुळे पर्यटकांची निराशा
काजव्यांचं विलक्षण दृश्य यंदा फिकं पडलं, भंडारदऱ्यात मान्सूनच्या लवकर आगमनामुळे पर्यटकांची निराशा
निवडणुकीनंतर किरण कुलकर्णींची बदली का केली, त्यांची नार्को टेस्ट करा; फडणवीसांच्या लेखावर काँग्रेसची मागणी
निवडणुकीनंतर किरण कुलकर्णींची बदली का केली, त्यांची नार्को टेस्ट करा; फडणवीसांच्या लेखावर काँग्रेसची मागणी
अमोल मिटकरी म्हणाले, दादा-ताई आषाढीपर्यंत एकत्र येतील; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
अमोल मिटकरी म्हणाले, दादा-ताई आषाढीपर्यंत एकत्र येतील; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
Nashik Crime : धक्कादायक! नाशिकमध्ये टवाळखोरांचा हैदोस, 15 जणांकडून कोयते, दांडके अन् दगडं हातात घेत नागरिकांच्या घरांवर हल्ला
धक्कादायक! नाशिकमध्ये टवाळखोरांचा हैदोस, 15 जणांकडून कोयते, दांडके अन् दगडं हातात घेत नागरिकांच्या घरांवर हल्ला
Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, पाच तासांपासून वाहतूक ठप्प; वाहनांच्या लांबच लांब रांगा
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, पाच तासांपासून वाहतूक ठप्प; वाहनांच्या लांबच लांब रांगा
Embed widget
OSZAR »