Ravindra Dhangekar: अजितदादांच्या पदाधिकाऱ्यासह पोलिसांवर धंगेकरांकडून आरोपांची राळ; वेश्या व्यवसाय, लैंगिक अत्याचार, पैशांसाठी धर्मांतर अन् बरंच काही...

Ravindra Dhangekar: वेश्या व्यवसाय, लैंगिक अत्याचार, पैशांसाठी धर्मांतर अजितदादांच्या पदाधिकाऱ्यासह पोलिसांवर धंगेकरांचे गंभीर आरोप, केल्या या महत्त्वाच्या मागण्या

Continues below advertisement

पुणे: पुणे शहरात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर अल्पवयीन मुली आणि महिलांसंबंधीच्या अत्याचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं चित्र आहे. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचा राज्य उपाध्यक्ष शंतनु कुकडे याच्यावर बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचाराचा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणात सापडलेला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता शंतनू कुकडे याच्यावर शिवसेना नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांचे गंभीर आरोप केले आहेत. 
 
शिवसेना नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ते बोलताना म्हणाले, दोन दिवसांपूर्वी समर्थ पोलिस स्टेशनमध्ये शंतनु कुकडेवर गुन्हा दाखल झाला,तो राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. नेत्यांसोबत त्याचा वावर आहे. काल मी एक ट्विट केलं. त्या फ्रकरणात मी माहिती घेतली, तो क्लब चालवत होता, लहान मुलींच्या अनैतिक संबंध ठेवल्याच्या तक्रारी आहेत. या ठिकाणी अनेक राजकीय लोक पोलिस अधिकारी शासकीय लोकांचा वावर होता.
महिला आयोग यांना पत्र दिलं, त्यांनी याबाबत चौकशी करायला सांगितले. तो धर्मांतर करायला लावतो,अनेक लोक त्याच्यासोबत काम करत आहेत. करोडो रुपये त्याने जमवले आहेत. तो अनेक धंदे करतो, याचा तपास पोलिसांनी का केला नाही, यात राजकीय लोक सोबत असतात, या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा असंही पुढे धंगेकरांनी म्हटलं आहे. 

Continues below advertisement

या सर्व प्रकरणाच्या मागच्या सर्व छडा लावावा. मी अजितदादांना विनंती करणार आहे, त्यांनी पक्षातून अशा लोकांना काढून टाकावे, त्यांच्यावरती कारवाई करावी. काल पोलिसांना याविषयी माहिती दिली आहे. याला जरब बसवली पाहिजे. समर्थ पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक गीते यांच्याकडून तपास काढला पाहिजे. पोलिस गुन्हा लपवत आहेत का असा प्रश्न आहे? प्रदेशातून पैसे येतात, इथं खर्च केला जातो, तर याचा तपास झाला पाहिजे. पोलिस आयुक्त यांना पत्र लिहून हा तपास सिनियर पोलिस अधिकारी यांच्याकडून काढून घ्यावा, सक्षम अधिकारी द्यावा, अशी मागणी करणार असल्याचंही धंगेकर म्हणाले आहेत. 

त्याचबरोबर शंतनु कुकडे याची बँक खाती तपासली पाहिजे. हा अजित पवारांच्या पक्षाचा पदाधिकारी आहे, त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या पण चौकशी कराव्या. पुण्यातील पूर्ण दादा गट सोबत होता का? याचा तपास करावा, अजित दादांनी कारवाई करावी याचा सखोल तपास झाला पाहिजे. पोलिसांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातोय. कुकडे याला परदेशातून पैसे येतात त्या पैशाचा वापर करून अनेक धर्मांतर केल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे. कुकडेच्या बँक खात्याची आणि तो अवैधरित्या चालवत असलेल्या क्लबची चौकशी करावी, अशी धंगेकर यांनी मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करावी यांची मागणी धंगेकरांनी केली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी रक्कम किती आहे याचा तपास करावा. एक कोटी रुपये वाटले आहेत. धर्मांतर आकडा किती आहे, पैसे किती आहेत? याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे असंही धंगेकर म्हणालेत. 

धंगेकरांची सोशल मिडिया पोस्ट

शंतनू कुकडे नावाच्या एका नराधमावर पुणे शहरातील समर्थ पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
खरंतर या व्यक्तीबद्दल यापूर्वी माझ्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या परंतु गेल्या काही दिवसांपासून आम्ही सबळ पुराव्यांची जुळवाजुळव करत होतो. हे प्रकरण केवळ बलात्कारापुरते मर्यादित नसून ही व्यक्ती धर्मांतराचे मोठे रॅकेट पुणे शहरात राबवते. गोरगरीब हिंदू कुटुंबांना टार्गेट करून त्यांचे बळजबरीने धर्मांतर घडवून आणले जाते. काही गरजू कुटुंबातील महिला व मुलींच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे प्रकार या नराधमाकडून केले जातात तसेच काही हाय प्रोफाईल व्यक्तींना मुली पुरवण्यापर्यंतचा उद्योग नराधम करतो. समर्थ पोलीस स्टेशनकडे याबाबत यापूर्वी तक्रारी दाखल होऊन देखील त्यांनी या प्रकरणात हलगर्जीपणा केला आहे.या शंतनु कूकडे कडुन मिळणाऱ्या मलईमुळे संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी आजवर त्याला सांभाळून घेतात, या प्रकरणात देखील मुसा, मुनीर, प्रतीक, सागर, जैन व पूनम आदी नामक व्यक्तींचा सहभाग असून हा तपास अतिशय थंड गतीने व चुकीच्या दिशेने सुरू आहे.

माझी पोलीस प्रशासनास विनंती आहे की आपण या सगळ्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी. कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू कुटुंबीयांची अश्या प्रकारची फसवणूक करत धर्मांतराचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. या नराधमाच्या बँक खात्यांची चौकशी केली असता देशाबाहेरील ट्रस्ट कडून कोट्यावधी रुपये धर्मांतरासाठी देणगी मिळाल्याचे देखील माहिती मिळाली आहे.

हिंदू म्हणजे काय विकाऊ वाटले का....? कोणी यावं पैसे द्यावे आणि त्यांचे धर्मांतर करून त्यांच्यावर अत्याचार करावे...?
पुणे शहरात या पुढील काळात या सगळ्या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. माझी सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांना देखील विनंती आहे अशा प्रकारच्या नराधम व्यक्तीची पक्षातून तातडीने हकालपट्टी करावी.

नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचा राज्य उपाध्यक्ष शंतनु कुकडे याच्यावर बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचाराचा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे .शंतनु कुकडे याचा पुणे कॅम्प परिसरात आलीशान बंगला आहे. या बंगल्यात तो गरजु विद्यार्थांसाठी राहण्याची सोय करतो. काही महिन्यांपुर्वी या बंगल्यात दोन मुली राहण्यासाठी आल्या होत्या. त्यापैकी एक अल्पवयीन होती. या दोन मुलींनी शंतनु कुकडे ने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार केल्यानंतर कुकडेवर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आलाय. शंतनु कुकडे (Shantanu Kukde) हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय होता. त्याचमुळे पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्षपद त्याच्याकडे सोपवण्यात आलं होतं. (Pune Crime)
पुण्यात एका बंगल्यात तो डान्सबार चालवत असल्याचा धक्कादायक प्रकारही सुरू असल्याची चर्चा आहे. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली असून शंतनू कुकडेवर काय कारवाई होते हे महत्त्वाचे ठरणार आहे .

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »